ईव्हीएम मशीनमध्ये कोणाचं नाव वर-खाली ते कोण ठरवतं? जाणून घ्या

काहींची नावे सर्वात वर तर काहींची नावे तुम्हाला सर्वात खाली दिसतात. पण असं का होतं? या नावांचा क्रम कोण ठरवतं? याबद्दल जाणून घेऊया.

| Apr 29, 2024, 18:32 PM IST

EVM machine Candidate:काहींची नावे सर्वात वर तर काहींची नावे तुम्हाला सर्वात खाली दिसतात. पण असं का होतं? या नावांचा क्रम कोण ठरवतं? याबद्दल जाणून घेऊया.

1/9

ईव्हीएम मशीनमध्ये कोणाचं नाव वर-खाली ते कोण ठरवतं? जाणून घ्या

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

भारतासारख्या मोठी लोकशाही असलेल्या देशात निवडणूक ही नेहमी जटिल प्रक्रिया असते. ही सुरळीत पार पडावी म्हणून निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएमचा वापर केला जातो. 

2/9

काही उमेदवार सारख्या नावाचे

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

ईव्हीएममध्ये आपल्याला उमेदवारांची नावे दिसतात. यात काही उमेदवार सारख्या नावाचेदेखील असतात. काहींची नावे सर्वात वर तर काहींची नावे तुम्हाला सर्वात खाली दिसतात. पण असं का होतं? या नावांचा क्रम कोण ठरवतं? याबद्दल जाणून घेऊया. 

3/9

सत्ताधारी, विरोधक?

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

सत्ताधारी उमेदवार म्हणून पहिलं नाव आणि विरोधक म्हणून शेवटी असं असल्याचे काहीजण सांगतात. पण असं काहीच नसतं. असा भेदभाव निवडणूक आयोग करत नाही.

4/9

कसं ठरतं?

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे पक्षानुसार ठरते. तर काहींच्या म्हणण्यानुसार हे अल्फाबेट म्हणजेच ए, बी, सी, डी च्या आधारावर ठरते. पण असंही काहीच नसते. 

5/9

नावातील मुळाक्षर

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

ईव्हीएम मशिनवर नाव देताना पक्षाच्या दर्जासोबत उमेदवाराच्या नावातील मुळाक्षर पाहिले जाते. 

6/9

मराठी वर्णमालेप्रमाणे नावे

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

ईव्हीएममध्ये उमेदवाराचे नाव त्या राज्याच्या भाषेवरुन ठरते. महाराष्ट्राची मराठी भाषा आहे मग मराठी वर्णमालेप्रमाणे नावे दिसतील.

7/9

नावातील मुळाक्षरे

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

मराठीमध्ये क, ख, ग, घ अशी वर्णमाला आहे. मग नावा, आडनावाच्या सुरुवातील जे मुळाक्षर असेल त्यानुसार उमेदवारांची नावे ठरतात.

8/9

अर्ज भरताना नाव

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

उमेदवाराला ईव्हीएम मशिनमध्ये काय नाव असले पाहिजे हे अर्ज भरताना विचारलं जातं. तो आधी स्वत:चं नाव किंवा आडनाव देऊ शकतो. 

9/9

दोन सारख्या नावाचे उमेदवार

LokSabha Election 2024 How Candidate Name How Decided in the EVM machine

दोन सारख्या नावाचे उमेदवार असतील तर त्यांचा व्यवसाय किंवा घराचा पत्ता अशा गोष्टींवरुन आयोग क्रम ठरवते. मतदारांचा जास्त गोंधळ होणार नाही, हे पाहिले जाते.