लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार, मुलांवर करतील सकारात्मक संस्कार
Lokmanya Tilak Punyatithi : दरवर्षी 1 ऑगस्टला बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते. 1 ऑगस्ट 1920 साली त्यांचे निधन झाले होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.
'स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असे ब्रीद वाक्य आपल्या सर्वांच्या मनावर कोरले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. टिळकांनी आपल्या चळवळीतून इंग्रजांना सळो की, पळो करुन सोडले होते. टिळकांनी अनेक सामाजिक कार्यांसोबतच गणोशोत्सवाला सुरुवात केली. तसेच विविध हिंदू संस्कृती आणि परंपरेच त्यांनी जतन केले. जाणून घेऊया त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जीवनाला प्रेरणा देणारे विचार.