लोकसभा निवडणूक २०१९ : उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यात टक्कर

Apr 01, 2019, 17:27 PM IST
1/4

मुंबईच्या राजकारणातील २ मोठी नावं

मुंबईच्या राजकारणातील २ मोठी नावं

प्रिया दत्त अभिनेता आणि नेते सुनील दत्त यांची मुलगी आहे. तर पूनम महाजन दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची मुलगी आहे. सुनील दत्त या मतदारसंघातून ५ वेळा खासदार होते. प्रमोद महाजन हे भाजपचे मुख्य राष्ट्रीय नेते आणि माजी खासदार होते.

2/4

पूनम महाजन यांना विजयाचा विश्वास

पूनम महाजन यांना विजयाचा विश्वास

 पूनम महाजन यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने येथे चांगलं काम केलं आहे. पण 2014 लोकसभा आणि 2017 च्या महापालिका निवडणुकीत येथे भाजपचं मतदान वाढलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.' हा काँग्रेसचा गड मानला जातो. 

3/4

५ वर्षात जनतेसाठी काम केलं - पूनम महाजन

५ वर्षात जनतेसाठी काम केलं - पूनम महाजन

आपल्या कामगिरी बद्दल बोलताना खासदार पूनम महाजन यांनी म्हटसं की, ‘‘मी येथील लोकांना घर आणि शौचालयाशी संबंधित समस्यांना सोडवण्यासाठी त्यांना वचन दिलं होतं. मी माझ्या खासदार निधीतून बांद्रा, कुर्ला आणि चांदिवली भागात 1,428 शौचालयं बांधली. मी तीन एफएसआयमध्ये 580 वर्गफुट घरांच्या 20,000 एमएचएडीए कॉलनीच्या पूननिर्माणासाठी काम केलं. विमानतळाजवळील भूमीवरुन 80,000 कुटुंबाचं पूनर्वसन केलं.'

4/4

राहुल गांधींच्या सांगण्यावरुन निवडणूक लढवत आहे - प्रिया दत्त

राहुल गांधींच्या सांगण्यावरुन निवडणूक लढवत आहे - प्रिया दत्त

प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे की, त्यांची लढाई ही त्या लोकांसाठी आहे जे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतात. या सीटवरुन २०१९ ची निवडणूक न लढवण्याची त्यांची घोषणा ही पक्षातील अंतर्गत वादामुळे होती. मतदारसंघातील लोकांची मागणी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.