92476403800 रुपयांचा मालक आहे हा पुणेकर! भारतातील सर्वात नवा अब्जाधीश नेमकं करतो तरी काय?

Know About The India Newest Billionaire He Is From Pune: भारतामधील नव्या अब्जाधिशांमध्ये या पुणेकराचा नुकताच समावेश झाला आहे. हा पुणेकर आहे तरी कोण? तो करतो काय? त्याची एकूण संपत्ती एवढी कशी काय जाणून घेऊयात सविस्तर...

| Oct 19, 2024, 09:01 AM IST
1/15

saurabhpng

पुणेकरांना अभिमान वाटेल अशी बातमी... जाणून घ्या 9247 कोटींचा मालक असलेला हा पुणेकर आहे तरी कोण?

2/15

saurabhpng

पुण्यातील पी एन गाडगीळ ज्वेलर्सचे सर्वसर्वा असलेले सौरभ गाडगीळ अब्जाधीश झाले आहेत.   

3/15

saurabhpng

मागील काही काळापासून पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स शेअर मार्केटमधील दमदार एन्ट्रीमुळे चर्चेत आहे. सराफा व्यवसायात काम करणारी गाडगीळ कुटुंबाची सौरभ यांची सहावी पिढी आहे.  

4/15

saurabhpng

सौरभ हे सध्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स म्हणजेच पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय निर्देशक आहेत.  

5/15

saurabhpng

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ बाजारामध्ये आल्यानंतर सौरभ यांची संपत्ती 1.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वधारली आहे. आयपीओमुळे सौरभ अब्जाधीश झाल्याचं ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सने म्हटलं आहे. भारतीय चलनानुसार 1.1 अब्ज डॉलर्स ही रक्कम 9247 कोटी 64 लाख 03 हजार 800 रुपये इतकी होते.

6/15

saurabhpng

सौरभ यांच्या मालकीच्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत आयपीओनंतर 61 टक्क्यांनी वधारली आहे.  

7/15

saurabhpng

सौरभ गाडगीळ हे 47 वर्षांचे आहेत. ते राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळपटू असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे.  

8/15

saurabhpng

"राष्ट्रीय स्तरावरील माजी बुद्धीबळपटू असल्याने आयुष्यातही कायम 30 पावलं पुढे विचार करणं हे माझ्या सवयीचा भाग झालं आहे," असं सौरभ यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये लिहिलं आहे.  

9/15

saurabhpng

"1998 सालापासून माला ही सवय झाली. त्याचवर्षी मी कुटुंबाचा पारंपारिक पीएनजी ज्वेलर्सचा उद्योग हाती घेतला होता," असं सौरभ सांगतात.  

10/15

saurabhpng

ब्लुमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 साली सौरभ आणि त्यांची पत्नी राधिकाबरोबरच त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांनी एकत्रितपणे पगार म्हणून 27 कोटी 24 लाख रुपये घेतले.   

11/15

saurabhpng

पुण्यातील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीकॉमची पदवी घेतल्यानंतर सौरभ गाडगीळ यांनी सिम्बायोसिस विद्यापीठामधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं.  

12/15

saurabhpng

सिम्बायोसिसमधून शिक्षण घेत असताना सौरभ गाडगीळ यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशीपही केली.  

13/15

saurabhpng

"मी सोन्याची बाजारपेठ पूर्णपणे समजून घेतली. जागतिक स्तरावर ही बाजारपेठ पुढे कशी वाटचाल करेल हे ही समजून घेतलं. याचा मला पुढे जेव्हा मी आमच्या कंपनीत काम सुरु केलं तेव्हा फायदा झाला," असं सौरभ गाडगीळ यांनी 2018 मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

14/15

saurabhpng

पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची स्थापना 1832 साली गणेश नारायण गाडगीळ यांनी केली. ते त्यावेळी सांगलीमध्ये फुटपाथवर सोन्याचे दागिने विकायचे, असं ब्लुमबर्गचं म्हणणं आहे.   

15/15

saurabhpng

या कंपनीचे प्रोडक्ट पीएनजी या ब्रॅण्डनेमखाली विकले जातात. याअंतर्गत वेगवेगळे सबब्रॅण्ड्स आहेत. एकूण 39 रिटेल दुकानं असून ऑनलाइन माध्यमातूनही या ब्रॅण्डच्या दागिन्यांची विक्री केली जाते.