KL Rahul च्या जागी कोण खेळणार WTC ची Final? गांगुलीने सुचवलं 'या' दिग्गज खेळाडूचं नाव!

Sourav Ganguly On WTC Final 2023:  राहूलच्या (KL Rahul) जागी संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये (ind vs aus) कोण खेळणार? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

| May 06, 2023, 18:33 PM IST

World Test Championship Final 2023: सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार केएल राहुल याला फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या (RCB vs LSG) सामन्यात केएल राहुल फिल्डिंग करताना अचानक मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर आता तो आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडला आहे.

1/7

मांडीला झालेल्या दुखापतीमुळे केएल राहूलला आयपीएलमधून माघार घ्यावी लागत आहे. त्याचा दुहेरी फटका बसल्याचं दिसतंय. आयपीएलमध्ये लखनऊला मोठा दणका बसलाय तर दुसरीकडे टीम इंडियाला.

2/7

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी केएल राहूलला संधी देण्यात आली होती. मात्र, आता त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधूनही बाहेर व्हावं लागलंय.

3/7

केएल राहुलच्या जागी टीम इंडियामध्ये करुण नायर या स्टार बॅट्समनची एन्ट्री झालीये. त्यामुळे आता राहूलच्या जागी संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

4/7

रहाणे संघात सामील असल्याने गांगुली यांनी अजिंक्य रहाणेच्या नावावर मोहर लावली आहे. मात्र, त्यांनी अंतिम निर्णय हा राहुल द्रविड यांचाच असेल, असं देखील म्हटलंय. नेमकं काय म्हणाला गांगुली?

5/7

मला अजिंक्य रहाणे नेहमीच आवडतो, त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तो चांगला खेळाडू असल्याचं सिद्ध करतो. अजिंक्य रहाणेला जशा संधी मिळतात तशा रोजच्या रोज येत नाहीत, असं गांगुलीने म्हटलं आहे.

6/7

मला वाटतं डब्ल्यूटीसी फायनलमध्ये त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर तो त्याचा पुरेपूर वापर करेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केलाय.

7/7

अजिंक्य उत्तम टेस्ट खेळाडू आहे, तसेच मेहनती खेळाडू आहे, म्हणून मी त्याला डब्ल्यूटीसी फायनलसाठी संघात स्थान देईन, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.