लसणाची सालं कचरा म्हणून फेकून देऊ नका, किचनमध्ये असा करा वापर!

फोडणीचा स्वाद वाढवण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने जेवणात लसणाचा वापर केला जातो. मात्र, लसूण सोलून झाल्यानंतर त्याची साले कचऱ्यात फेकून दिली जातात. मात्र, त्या सालांचा असा करा वापर 

| Oct 19, 2023, 18:25 PM IST

Smart Kitchen Hacks In Marathi: फोडणीचा स्वाद वाढवण्यासाठी व आरोग्याच्या दृष्टीने जेवणात लसणाचा वापर केला जातो. मात्र, लसूण सोलून झाल्यानंतर त्याची साले कचऱ्यात फेकून दिली जातात. मात्र, त्या सालांचा असा करा वापर 

1/7

लसणाची सालं कचरा म्हणून फेकून देऊ नका, किचनमध्ये असा करा वापर!

kitchen tips in marathi smart uses of garlic peels in kitchen

लसूण सोलल्यानंतर राहिलेली सालं कचरा समजून तुम्ही डस्टबिनमध्ये फेकून देता का तर. थांबा तुम्ही लसणाच्या सालांचा असाही वापर करु शकता. 

2/7

घरातील कामात उपयोग

kitchen tips in marathi smart uses of garlic peels in kitchen

लसूण हा आरोग्यवर्धक आहे. दररोज जेवणात लसूण वापरल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण लसणाच्या पाकळ्यांसोबतच त्याच्या सालांचेही खूप फायदे आहेत. लसणाची साले कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा त्याचा घरातील कामात उपयोग करु शकता. कसं ते जाणून घ्या. 

3/7

भांडी स्वच्छ करण्यासाठी

kitchen tips in marathi smart uses of garlic peels in kitchen

भांडी स्वच्छ करण्यासाठी लसणाच्या सालांचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यासाठी सगळ्यात आधी सालं उन्हात चांगल्यापद्धतीने सुकवून घ्या त्यानंतर त्याचा वापर करुन स्क्रब करुन साफ करुन घ्या.   

4/7

कपड्यांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी

kitchen tips in marathi smart uses of garlic peels in kitchen

लसणाची साले सुकवून एका सुती कापडात बांधून ठेवा. त्यानंतर कपाटात किंवा जिथे कपड्यांना दुर्गंधी येते अशा जागेत ठेवा. लसणाची साले दुर्गंधी शोषून घेतात. त्यामुळं कपड्यांमधून फ्रेश सुगंध येतो. 

5/7

खताचा पोत सुधारतो

kitchen tips in marathi smart uses of garlic peels in kitchen

तुम्हीपण घरात फुलांची किंवा शोभेची झाडे फुलवली आहेत. तर, झाडांमध्ये वापरण्यात येणाऱ्या खतामध्ये लसणाची साले मिसळा. यामुळं लसणाच्या सालात असलेले पोषक तत्वे यात उतरतात आणि खताची पोत सुधारते. 

6/7

किचनमध्ये वापरा

kitchen tips in marathi smart uses of garlic peels in kitchen

लसणाच्या सालात सुद्धा एक वेगळाच स्वाद असतो. त्यामुळं फोडणीतदेखील याची चव उतरते. तुम्ही व्हिनेगरमध्ये लसणाची साले टाकून सलाडमध्ये त्याचा वापर करुन शकता. किंवा लसणाच्या साले मिक्सरमधून काढून मीठात एकजीव करुन घ्या

7/7

लसूण सोलायची सोपी पद्धत

kitchen tips in marathi smart uses of garlic peels in kitchen

 लसूण सोलण्यासाठी, तव्यावर हलके गरम करा. यामुळे त्याची साल सहज निघते.