Karnataka Elections: "राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात..."; प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी निपाणीमधील जाहीर सभेमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट उल्लेख करत निशाणा साधत कर्नाटकमधील जनतेला एक आवाहन केलं.

Swapnil Ghangale | May 08, 2023, 13:12 PM IST
1/7

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023

महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीही कर्नाटकमध्ये भाजपाचा प्रचार करत आहेत.

2/7

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023

रविवारी कर्नाटकमधील मराठी बहुभाषिक प्रांत असलेल्या निपाणीमधील जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला.

3/7

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023

निपाणीमधील भाजपाच्या उमेदवार शशीकला जोले यांच्या प्रचारसभेत फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीने केवळ निपाणीमध्ये उमेदवार दिला आहे.

4/7

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023

राष्ट्रवादीच्या याच एकमेव उमेदवाराचा उल्लेख करत फडणवीस यांनी, मताच्या विभाजनासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संगनमताने उमेदवार जाहीर केल्याचा आरोप केला.

5/7

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023

"राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे," असं फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रवादीवर निशाणा साधताना म्हटलं.

6/7

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023

"त्यांना (राष्ट्रवादीला) पॅकबंद करून महाराष्ट्रात पाठवा, आम्ही (त्यांना) पाहून घेऊ," असंही फडणवीस राष्ट्रवादीबद्दल भाष्य करताना म्हणाले.

7/7

Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023

जय श्रीराम, बजरंग बली की जय असं म्हणणं जर या देशात गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा रोज करू. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर आडवून दाखवा, असं थेट आव्हानही फडणवीस यांनी या सभेतील भाषणामधून केलं.