रणधीर कपूर - बबीता कपूर यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदा बोलली करिना कपूर
Dec 20, 2020, 09:11 AM IST
1/8
करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. दुसऱ्यांदा पालक होण्याअगोदर करिनाने आपल्या पालकांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.
2/8
करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने नुकत्याच एका मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या. आई बबिता घटस्फोट घेतल्यानंतर कशापद्धतीने करिनाची आणि करिश्माची काळजी घेत आहे. हे देखील तिने सांगितलं.
TRENDING NOW
photos
3/8
या दरम्यान करिना कपूर तिचं बालपण आणि पालकांबद्दल सांगते. मला माहित आहे की, माझी आई सर्वात चांगली मैत्रिण आहे. पण यासोबतच मी माझ्या वडिलांचा देखील आदर करते. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे.
4/8
यापुढे आपले वडिल रणधीर कपूर यांच्याबद्ल बोलताना करिना म्हणते की, 'ते आपल्या भावना कधीच कुणासमोर व्यक्त करत नाहीत. ते अतिशय शांत राहून आपलं नातं सांभाळत असतात. ते कायमच आमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. ते त्या लोकांप्रमाणे नाहीत ज्यांना कायमच अटेंशन हवं असतं. मी हे कायमच जाणते.
5/8
यापुढे करिनाने म्हटलंय की,भारतीय समाजात तलाक म्हणजे नातं तोडण्यासारखं झालं. पण करिना सांगते की, आजही तिच्या पालकांच नातं अतिशय सुंदर आहे.
6/8
करीना म्हणते की,`माझ्या पालकांच नातं खूप वेगळं आहे. कधी कधी काही व्यक्तींना लक्षात येतं की, एकमेकांसोबत आपलं नातं तसं नाही जसा आपण विचार करतो. यामुळे ते एकत्र न राहण्याचा निर्णय घेतात. मात्र यानंतरही हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत.'
7/8
एवढंच नाही करिना सांगते की, रणधीर कपूर आणि बबीता हे आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत. वेगळे होऊनही दोघं आम्हा मुलांच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी कायम एकत्र चर्चा करतात.
8/8
या सोबतच करीनाने म्हटलं की,'हे महत्वाचं नाही की प्रत्येकवेळी ते एकत्र राहतील. करिश्मा आणि मी हे खूप आधीच ओळखलं होतं की, या पद्धतीची नाती संपतात. माझे आई-वडिल गेेले ३५ वर्षे अशीच राहत आहेत.'
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.