कॉमेडी किंग कपिल शर्माचं शिक्षण किती माहितीये का?

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माला कोण ओळखत नाही. कपिल शर्माला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. कपिल शर्मा हा आपल्याला फक्त कॉमेडी शोमध्ये दिसत नाही तर त्यासोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये देखील दिसतो. पण तुम्हाला माहितीये का की आपल्याला सतत हसवणारा कपिल शर्माचं शिक्षण किती झालं आहे. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.    

| Apr 02, 2024, 12:04 PM IST
1/7

कपिल शर्मा

कपिल शर्माचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. त्याचा कपिल शर्मा हा शो खूप लोकप्रिय झाला होता. आता कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

2/7

कपिलनं केलीत छोटी मोठी कामं

कपिल शर्मा आज इतका लोकप्रिय असला तरी त्या आधी त्यानं छोटी-मोठी काम करत दिवस काढले आहेत. 

3/7

शिक्षण

कपिलनं त्याचं शालेय शिक्षण हे अमृतसरमध्ये केलं आहे. त्यानंतर त्यानं जालंधरच्या एपीजे कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समधून ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं. 

4/7

कपिलचे वडील काय करायचे

कपिल शर्माचे वडील हे पोलिसमध्ये होते. तर कॉलेजमध्ये असताना पॉकेटमनीसाठी कपिलनं काम करण्यास सुरुवात केली होती. 

5/7

शिक्षण करताकरता कॉलेजमध्ये करायचा हे काम

कपिल शर्मा हा कॉलेजमध्ये असताना कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर त्यानं मुंबईत येऊन काही तरी करण्याचा निर्णय घेतला. 

6/7

लाफ्टर चॅलेन्ज विजेता

मुंबईत आल्यानंतर कपिल शर्मा लाफ्टर चॅलेन्ज विजेता ठरला होता. त्यानंतर त्यानं त्याचा कॉमेडि नाइट्स विथ कपिल हा शो सुरु केला. 

7/7

'द ग्रेट इंडियन कपिल शो'

आता कपिल शर्मा हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मुळे चर्चेत आहे. (All Photo Credit : Kapil Sharma Show)