जया किशोरींनी दिल्या नात्यात प्रेम वाढवण्याच्या टिप्स, 'जोडीदाराच्या 'या' गोष्टी आवडल्या पाहिजेत'

ज्या गोष्टींचा पाया कमकुवत आहे त्या गोष्टी बदलतात किंवा संपतात हे निश्चित आहे. जोडीदारातील प्रेमालादेखील ही गोष्ट लागू होते, असे जया किशोरी सांगतात. 

| Dec 09, 2023, 09:51 AM IST

Jaya Kishoris Love tips: ज्या गोष्टींचा पाया कमकुवत आहे त्या गोष्टी बदलतात किंवा संपतात हे निश्चित आहे. जोडीदारातील प्रेमालादेखील ही गोष्ट लागू होते, असे जया किशोरी सांगतात. 

1/9

जया किशोरींनी दिल्या नात्यात प्रेम वाढवण्याच्या टिप्स, जोडीदाराच्या 'या' गोष्टी आवडल्या पाहिजेत

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

Jaya Kishori Relationship Tips:जया किशोरी या देशातील तरुण मोटिवेशन स्पीकर आहेत. आयुष्य कसं जगायला हव, नात्यात काय काळजी घ्यायला हवी, प्रेमात संवाद किती महत्वाचा आहे अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन करत असतात. 

2/9

लाखो फॉलोअर्स

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

जया किशोरी यांच्या प्रवचनाला हजारो भाविकांची गर्दी असते. दुसरीकडे सोशल मीडियावरही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

3/9

कसं साध्य करायचं?

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

जया किशोरी यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. ज्यामध्ये त्या प्रेमाचा पाया मजबूत ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्व सांगत आहेत. यासोबत हे कसं साध्य करायचं? याबद्दल मार्गदर्शनही करत आहेत.

4/9

गोष्टींचा पाया कमकुवत

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

ज्या गोष्टींचा पाया कमकुवत आहे त्या गोष्टी बदलतात किंवा संपतात हे निश्चित आहे. जोडीदारातील प्रेमालादेखील ही गोष्ट लागू होते, असे जया किशोरी सांगतात. 

5/9

भावना लगेच बदलतात

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्या गोष्टीपेक्षा दुसरे काहीतरी आवडते तेव्हा त्याच्या भावना लगेच बदलतात. किंवा असे काहीतरी घडत जाते ज्याबद्दल तो पूर्णपणे समाधानी नसतो. 

6/9

बाह्य सौंदर्यावर प्रेम नको

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

बाह्य सौंदर्यामुळे कोणीही प्रेमात पडत नाही, असे जया किशोरी सांगतात. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला एखादा व्यक्ती त्याच्या दिसण्यामुळे आवडत असेल तर असे प्रेम फार काळ टिकत नाही. 

7/9

नात्यातील धोका

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

10 महिन्यांत तुम्हाला तुमचा जोडीदार सुंदर दिसायचा बंद होईल आणि नातेसंबंधातील गोष्टी गृहीत धरू लागतील, असे जया किशोरी सांगतात. 

8/9

नाते काळाबरोबर सुंदर

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

माणसाच्या सवयी, विचार आणि मानसिकतेतून खरे प्रेम येते. या गोष्टी नेहमी दोन व्यक्तींना जोडून ठेवतात. जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयीच्या या आंतरिक गोष्टी आवडतात, तेव्हा नाते काळाबरोबर सुंदर बनते. नात्यात प्रेम संपेल अशी वेळ कधीच येत नाही.

9/9

प्रयत्न केल्यानेच नाते मजबूत

Jaya Kishori Love tips Relationship For partner Behaviour Marathi News

जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे आणि तुमच्या जोडीदारातील प्रेम संपत आहे, तेव्हा एकमेकांना समजून घेणे सुरू करा. तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यानेच नाते मजबूत होते, असा निष्कर्ष यातून काढता येतो.