'शिव्या या भाषेसाठी...'; Standup कॉमेडीच्या नावाखाली शिव्या देणाऱ्यांना जावेद अख्तरांनी झापलं

Javed Akhtar On Use Of Abusive Language: आपल्या गाण्यांबरोबर रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावेद अख्तर यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन्सकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेत शिव्या अधिक असतात यासंदर्भात थेट विधान केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

| Oct 31, 2024, 09:28 AM IST
1/8

javedakhtar

एका विशेष मुलाखतीमध्ये जावेद अख्तर स्टॅण्डअप कॉमेडियन्सकडून वापरल्या जाणाऱ्या शिव्यांवर स्पष्टच बोलले. ते काय म्हणालेत पाहूयात...

2/8

javedakhtar

आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या काही मोजक्या सेलिब्रिटींमध्ये गीतकार जावेद अख्तर यांचा समावेश होतो. त्यांच्या या रोखठोक बोलण्याच्या अंदाजाचा नमुना पुन्हा एकदा त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळाला. ही मुलाखत त्यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन्सला दिली आहे.  

3/8

javedakhtar

या मुलाखतीदरम्यान, आम्ही कॉमेडी करतो तेव्हा शिव्या देतो. त्यावर लोक हसतात. मग आम्हालाही सवय लागते. त्यामुळे आम्हाला शिव्यांचं एवढं वाईट वाटत नाही जेवढं इतरांना वाटू शकतं. विनोद करताना शिव्या दिल्या पाहिजेत की नाही? यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न स्टॅण्डअप कॉमेडियन बिस्वा याने जावेद अख्तर यांना विचारला.  

4/8

javedakhtar

"तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ओडिशा, बिहार आणि मॅक्सिको असो जगात कुठेही पार्टी होते तेव्हा लोक मिर्ची खातात. यामागील कारण म्हणजे जेवण चमचमीत किंवा झणझणीत नसतं. जेवणाला काहीतरी चव लागावी म्हणून ते मिर्ची खातात,"असं जावेद अख्तर म्हणाले.

5/8

javedakhtar

हा संदर्भ देत जावेद अख्तर यांनी, "शिव्या या भाषेसाठी या मिर्चीसारख्या असतात. तुम्ही चांगली भाषा वापरु शकत असाल आणि तुमच्याकडे विनोदाची शैली असेल तर तुम्हाला या मिर्चीची गरज पडत नाही," असं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

6/8

javedakhtar

"संवाद बेचव असेल तर तुम्ही त्याला ऊर्जा देण्यासाठी त्यात काही शिव्या टाकता," असा चिमटाही जावेद अख्तर यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन्सला काढला.  

7/8

javedakhtar

मुलाखत घेणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडियनपैकी एक असलेल्या सपन वर्माने, "तुम्ही फार काव्यात्मक पद्धतीने स्टॅण्डअप कॉमेडियन्सचा अपमान केला आहे. हे ऐकून वाईटही वाटत आहे आणि थोडं चांगलंही वाटतंय," अशी प्रतिक्रिया नोंदवली. याला दावेद अख्तर यांनी हसून प्रतिसाद दिला.

8/8

javedakhtar

पण शिव्या ऐकून काहींना दिलासा मिळत असेल तर? असं विचारण्यात आलं असता जावेद अख्तर यांनी, "शिव्या ऐकून काय दिलासा मिळणार? असे लोक असतील तर त्यांना आधी मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे," असा शा‍ब्दिक चिमटा काढला.