जान्हवी कपूरचा भूताचा अवतार घाबरतोय नेटकऱ्यांना, तुम्ही जान्हवीचे भयानक फोटो पाहिलेत का?

जान्हवी कपूरला प्रोस्थेटिक्स मेकअप करुन थांबाव लागलं तासंतास

Mar 10, 2021, 14:16 PM IST

मुंबई : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. 

1/5

जान्हवीची चर्चा एका वेगळ्या कारणानं आहे. लवकरच तिचा रुही हा सिनेमा येतोय. या सिनेमाचं प्रमोशन जान्हवी सध्या जोरदार करतेय. सध्या तिच्या रुही सिनेमातील लूकची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होतेय. रुही या भयपटात जान्हवी भूताच्या भयानक  भुमिकेत दिसणार आहे.

2/5

या सिनेमासाठी जान्हवीनं बरीच मेहनत घेतल्याचं दिसत आहे. जान्हवीनं तिच्या सोशल मीडिया अकांउन्टवरुन तिचे BTS फोटो शेअर केले आहेत. या सिनेमाच्या करेकेटरसाठई जान्हवीनं प्रोस्थेटिक्स मेकअप केल्याचं सांगितल आहे. हा मेकअप कृत्रिम पदार्थांनी बनवलेला असतो.

3/5

या सिनेमात वीएफअक्सचा वापर नॅचरल पॉवर दाखवणअयासाठी केला गेला आहे. प्रोस्थेटिक्स मेकअप असताना जान्हवीला तिच्या सीन शूटसाठी तासंतास वाट पाहावी लागली होती.रुही सिनेमाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी एका इंटरव्हूयमध्ये जान्हवीच्या लूकबद्दल चर्चा केली होती.

4/5

एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, जान्हवीच्या फायनल लूकसाठी जान्हवीला १० लूकटेस्ट द्याव्या लागल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, प्रोस्थेटिक्स मेकअप केल्यानंतर जान्हवी वेगळ्याचं भूमिकेत जायची ते आम्ही बघून सगळेच चक्रावून जायचो. तिची बॉडी लैंग्वेज, तिचा आवाज सगळच चक्रावून सोडायचं तिला बघून खरचं समोर भूत असल्याचा भास व्हायचा.

5/5

नुकताचं जान्हवीच्या रुही सिनेमाचा स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी जान्हवीने तिच्या असिस्टंटच्या परिवाला स्क्रिनींगला आमंत्रित केलं होतं.यावेळी जान्हवीने पिंक ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस अंदाजात दिसली होती. या सिनेमात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा स्क्रिन शेअर करणार आहेत. हा सिनेमा ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे.