#JammuAndKashmir : पृथ्वीवरील स्वर्गाचं शुभ्र सौंदर्य

Dec 11, 2018, 07:54 AM IST
1/6

#JammuAndKashmir : पृथ्वीवरील स्वर्गाचं शुभ्र सौंदर्य

संपूर्ण देशभरात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत असून, सर्वजण खऱ्या अर्थाने हिवाळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत. देशाच्या उत्तर भागात तापमानात प्रचंड घट झाली असून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- काश्मीर येथेही पारा बराच खाली उतरला आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)  

2/6

#JammuAndKashmir : पृथ्वीवरील स्वर्गाचं शुभ्र सौंदर्य

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जम्मू- काश्मीर येथील पटनीटॉप परिसरात बर्फवृष्टी झाली असून, संपूर्ण परिसरावर जणू बर्फाची चादर पसरली आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

3/6

#JammuAndKashmir : पृथ्वीवरील स्वर्गाचं शुभ्र सौंदर्य

फक्त पटनीटॉपच नव्हे तर, रजौरी भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी  झाल्यामुळे जम्मू- काश्मीर येथील मुघल रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

4/6

#JammuAndKashmir : पृथ्वीवरील स्वर्गाचं शुभ्र सौंदर्य

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील पर्वतीय परिसरात बर्फवृष्टी होत असून, मैदानी भागात मात्र हलकासा पाऊस सुरु असल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे एकंदरच हवामानातील हा बदल पाहता, स्थानिक प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

5/6

#JammuAndKashmir : पृथ्वीवरील स्वर्गाचं शुभ्र सौंदर्य

पुढील एक- दोन दिवस वातावरणात होणारा हा बदल असाच कायम राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. परिणामी उत्तरेकडील परिस्थिती पाहता देशातील इतर भागांमध्येही थंडीची लाट कायम राहणार आहे. (छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)

6/6

#JammuAndKashmir : पृथ्वीवरील स्वर्गाचं शुभ्र सौंदर्य

(छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)