इस्रोकडून रॉकेटोलॉजी शिकण्याची संधी; फी केवळ 699 रुपये

ISRO Chandrayaan 3 : तिथं इस्रो चांद्रयान 3 च्या मोहिमेसंदर्भात प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीसंदर्भातील अपडेट शेअर करत आहे. तर, इथं अनेकांनीच या संस्थेबाबत जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.   

Aug 25, 2023, 13:23 PM IST

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आजवर केलेली कामगिरी पाहता प्रत्येक देशवासियाला याबाबत कमालीचा अभिमान वाटत आहे. चांद्रयान मोहिमेला यशस्वी होताना पाहून अनेकांचं या संस्थेप्रती असणारं कुतूहल प्रचंड वाढलं आहे. 

 

1/7

चांद्रयान आणि इस्रोबाबतचं कुतूहल

isro organises rocket and other workshops know details

जवळपास 45 दिवसांचा प्रवास करून इस्रोनं अवकाशात पाठवलेलं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठावर पोहोचलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारं हे यान सध्या संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहेत. 

2/7

चांद्रयानाच्या निमित्तानं...

isro organises rocket and other workshops know details

चांद्रयानाच्या निमित्तानं चर्चा सुरु झालीये ती म्हणजे देशातील अत्यंत मानाच्या आणि अद्वितीय कामगिरी करणाऱ्या संस्थेची. ही संस्था नेमकी कशी काम करते, इथपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय करावं लागतं असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.   

3/7

इस्रोचं संकेतस्थळ

isro organises rocket and other workshops know details

काहींनी तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इस्रोच्या संकेतस्थळाचाही आधार घेतला आहे. जिथं गेलं असता एक कमाल गोष्ट तुमच्याही नजरेस पडेल. कारण, तुम्हीही इस्रोसोबत काही दिवसांसाठी का असेना पण, काम करु शकता. काहीतरी नवं शिकू शकता.   

4/7

रॉकेट वर्कशॉप

isro organises rocket and other workshops know details

इस्रोनं नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या वतीनं 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'रॉकेट वर्कशॉप' घेण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान हा Certified Course पार पडेल. ज्याची फी फक्त 699 रुपये इतकी आहे.   

5/7

तीन दिवसांची कार्यशाळा

isro organises rocket and other workshops know details

इस्रोचं आणखी एक कार्यशाळा 12 ते 14 ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहे. तीन दिवसांच्या या कार्यशाळेची वेळ दर दिवशी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. 

6/7

कुठे असेल कार्यशाळा?

isro organises rocket and other workshops know details

अंतरिक्ष भवन, बंगळुरू येथे ही कार्यशाळा भरेल. यासाठीची नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरु झाली असून, नोंदणीची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2023. कार्यशाळेसाठी निवड झालेल्यांची नावं 12 सप्टेंबर रोजी जाहीर केली जातील. 

7/7

कोण घेऊ शकतं सहभाग?

isro organises rocket and other workshops know details

तीन दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये 20 तांत्रिक बाबींवर आधारित व्याख्यानं घेण्यात येणार आहेत. शिवाय यामध्ये इस्रोच्या तज्ज्ञ मंडळींसोबत संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेणारे किंवा पूर्ण झालेले आणि पीएचडीसाठी अभ्यास करणारी मंडळी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.