NSAT-3DS Launch: नॉटी बॉय रॉकेट काय आहे? ज्यातून इस्रो लॉंच करणार सॅटेलाइट?

INSAT-3DS उपग्रह हे भूस्थिर कक्षेत ठेवल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या हवामानशास्त्रीय उपग्रहासाठी पाठपुरावा करणारे मिशन आहे. त्याला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. 

| Feb 17, 2024, 14:43 PM IST

ISRO NAUGHTY BOY: INSAT-3DS उपग्रह हे भूस्थिर कक्षेत ठेवल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या हवामानशास्त्रीय उपग्रहासाठी पाठपुरावा करणारे मिशन आहे. त्याला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. 

1/10

NSAT-3DS Launch: नॉटी बॉय रॉकेट काय आहे? ज्यातून इस्रो लॉंच करणार सॅटेलाइट?

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

ISRO Naughty Boy satellite: हवामान उपग्रह INSAT-3DS च्या प्रक्षेपणाची वेळ जवळ येत चालली आहे. 16 व्या मोहिमेअंतर्गत GSLV-F14 या प्रक्षेपण वाहनाचे उड्डाण शनिवारी संध्याकाळी 5.35 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे.

2/10

आर्थिक सहाय्य

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

INSAT-3DS उपग्रह हे भूस्थिर कक्षेत ठेवल्या जाणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या हवामानशास्त्रीय उपग्रहासाठी पाठपुरावा करणारे मिशन आहे. त्याला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. 

3/10

2024 मध्ये इस्रोची दुसरी मोहीम

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार 'GSLV-F14/INSAT-3DS मिशन हे 17 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजून 35 वाजता प्रक्षेपित होईल. या प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. 1 जानेवारी रोजी PSLV-C58/EXPOSAT मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर,  यावर्षीची इस्रोची दुसरी मोहीम आहे. 

4/10

उपग्रहाबद्दल

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

उपग्रह वाहून नेणाऱ्या रॉकेटची लांबी 51.7 मीटर आहे. या उपग्रहाचे वजन 2274 किलो आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर पृथ्वी विज्ञान अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांना यामुळे मदत होणार आहे. यामध्ये भारतीय हवामान विभाग (IMD), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT), नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टिंग आणि इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटर यांचा समावेश आहे. 

5/10

नॉटी बॉय हे नाव कसे पडले?

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

ज्या रॉकेटने हे हवामान उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहे त्याला इस्रोचा 'नॉटी बॉय' असे संबोधले जाते. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) ला इस्रोच्या माजी अध्यक्षांनी 'नॉटी बॉय' असे नाव दिले. या नावाची बरीच चर्चा सुरु आहे. माजी संचालकांनी इस्रोचा डेटा आणि त्याचा स्ट्राइक रेट लक्षात घेऊन हे नाव दिले आहे.

6/10

अपयशाचा दर 40 टक्के

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

खरं तर, या रॉकेटने आतापर्यंत 15 पैकी 6 फ्लाइटमध्ये अचूक परिणाम देण्यात अयशस्वी ठरला. म्हणजे त्याचा अपयशाचा दर 40 टक्के होता. GSLV F14 हे समस्यांना सामोरे जाण्यासाठी ओळखले जाते. म्हणून त्याचे नाव नॉटी बॉय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

7/10

अगदी अचूक हवामान अंदाज

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

INSAT-3DS चे प्रक्षेपण भारताच्या अंतराळ संस्थेसाठी खूप महत्वाचे आहे. कारण ते समुद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करून हवामान अंदाजाची अत्यंत अचूक माहिती देते. हे प्रक्षेपण आपत्ती निवारणात देखील उपयुक्त ठरणार आहे. भारतातील हवामान संस्थांसाठी INSAT-3DS लाँच खूप महत्त्वाचे मानले जात आहे.

8/10

नॉटी बॉय होणार निवृत्त

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

'नॉटी बॉय' या नावाने प्रसिद्ध असलेले GSLV हे तीन टप्प्यांचे रॉकेट आहे. ज्याद्वारे 420 टन वजन सहज अवकाशात पाठवले जाऊ शकते. रॉकेटमध्ये भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले असून आणखी काही प्रक्षेपणानंतर ते निवृत्त करण्याची इस्रोची योजना आहे.

9/10

बाहुबली रॉकेट

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

GSLV चे शेवटचे प्रक्षेपण 29 मे 2023 रोजी झाले होते आणि ती यशस्वी चाचणी होती. लाँच व्हेईकल मार्क-3 ला बाहुबली रॉकेट असेही म्हणतात. तो GSLV पेक्षा जड आहे आणि त्याचा चुलत भाऊ मानला जातो.

10/10

सातही मोहिमा यशस्वी

ISRO NAUGHTY BOY satellite GSLV-F14 Weather satellite INSAT-3DS

याने सात मोहिमा केल्या असून सातही मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. पीएसएलव्ही रॉकेटच्या यशाचा दरही 95 टक्के आहे. त्यामुळे GSLV रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे आहे.