'काम करायचं असेल तर माझ्यासोबत...', 'किसना' फेम अभिनेत्रीने सांगितला 'कास्टिंग काऊच'चा अनुभव

बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा उल्लेख करत या अभिनेत्याने तिला काम देण्याच्या बदल्यात अभिनेत्री समोर ठेवली होती अट.   

Soneshwar Patil | Jan 28, 2025, 13:56 PM IST
1/7

किसना फेम

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कटू सत्ये दडलेली आहेत, ज्याचा काही कलाकारांनी सामना केला आहे. 'किसना' फेम अभिनेत्रीने नुकताच एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून सगळेच थक्क झालेत.  

2/7

अभिनेत्री

 या अभिनेत्रीचे नाव ईशा शरवानी आहे. सौंदर्यासोबत ईशा तिच्या ग्लॅमरस लुकमुळे आणि उत्कृष्ट नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे. 

3/7

कास्टिंग काउच

नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत घडलेली एक अस्वस्थ करणारी घटना उघड केली आहे. 

4/7

अभिनेत्री थक्क

अभिनेत्रीने सांगितले की, एका अभिनेत्याने तिला कामाच्या बदल्यात त्याच्यासोबत झोपण्यास सांगितले होते. हे ऐकून ती थक्क झाली होती. ती म्हणाली, 'मी त्यावेळी प्रचंड घाबरले होते'.

5/7

मागणी नाकारली

मी शांतपणे उठून तिथून निघून गेले. नंतर मी त्याला फोन करून ही मागणी साफ नाकारली. त्यावेळी माझ्या मनात जे काही चालले होते ते म्हणजे कसे तरी स्वतःला सुरक्षित ठेवायचे.

6/7

नकार

अभिनेत्रीने सांगितले की त्यावेळी ती समोर येऊन हे बोलण्याचे धाडस करू शकली नाही. कारण तिचा नकार ऐकून ती व्यक्ती कशी प्रतिक्रिया देईल याची तिला भीती होती.

7/7

करिअरची सुरुवात

अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात सुभाष घई यांच्या 'किसना' या चित्रपटातून केली होती. त्यावेळी तिच्या नृत्यकौशल्यामुळे हा चित्रपट तिला मिळाला होता. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x