लॉकडाऊनमध्ये वर्सोव्याच्या कब्रस्तानात इरफान खानचं दफन

बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या दिग्गज कलाकार इरफान खानने बुधवारी जगाचा निरोप घेतला. गेल्या एक वर्षापासून इरफानला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाला होता. त्याने परदेशात यावर उपचार घेतले होते.

Apr 29, 2020, 17:22 PM IST

परदेशातून उपचार घेऊन आल्यानंतर इरफानने अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचं अर्धवट राहिलेलं शूटिंगही पूर्ण केलं होतं. मात्र हाच चित्रपट इरफानचा शेवटचा चित्रपट ठरला.

1/7

बॉलिवूड कलाकार इरफान खानची २०१८ पासून कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

2/7

इरफानच्या निधनानंतर संपूर्ण कालाविश्वावर शोककळा पसरली आहे. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

3/7

लॉकडाऊनदरम्यान वर्सोवा कब्रस्तानमध्ये इरफानला दफन करण्यात आलं. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

4/7

यावेळी त्याच्या कुटुंबातील केवळ 5 सदस्य आणि कलाविश्वातील काही कलाकार उपस्थित होते. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

5/7

लॉकडाऊनमुळे त्याला दफन करण्यावेळी अतिशय कमी लोकांना सामिल होण्याची परवानगी देण्यात आली होती. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

6/7

अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला सोमवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला रुग्णलयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

7/7

त्यानंतर बुधवारी त्याच्या निधनाची बातमी धडकली. इरफानच्या जाण्याने कलाविश्वासह अनेक चाहत्यांनी, नेतेमंडळींनीही हळहळ व्यक्त केली आहे. (फोटो सौजन्य : योगेन शाह)