PHOTO: मुंबई इंडियन्सने टाकला मोठा डाव! वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला घेतलं टीममध्ये

IPL 2025 Mumbai Indian Team: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी आता काहीच दिवस शिल्लक असून मुंबई इंडियन्सने आता वेगाने तयारीला सुरुवात केलीये. मागील काही सीजन मुंबई इंडियन्ससाठी खास ठरले नव्हते तर आयपीएल 2024 मध्ये मुंबई पॉईंट टेबलमध्ये बॉटमला होती. तेव्हा आता स्पर्धेत पुन्हा उभारी घेण्यासाठी मुंबईने एक मोठा डाव टाकला असून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला आपल्या संघात घेतलंय. 

Pooja Pawar | Oct 17, 2024, 13:05 PM IST
1/6

हेड कोच बदलल्या नंतर मुंबई इंडियन्सने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड आहे. पारस म्हाम्ब्रे आता टीमचे मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या लसिथ मलिंगा सोबत काम करतील. 

2/6

कोण आहे पारस म्हाम्ब्रे?

पारस म्हाम्ब्रे यापूर्वी देखील मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग राहिले आहेत. पारसनी मुंबई इंडियन्स सोबत ४ वर्षांपूर्वी काम केले होते. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र, बंगाल, बडोदरा आणि विदर्भ या देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या संघांना सुद्धा कोचिंग दिली आहे. पारस म्हाम्ब्रेकडे १२ वर्षांचा कोचिंगचा अनुभव असून हा अनुभव मुंबई इंडियन्ससाठी खूप कमी येईल. 

3/6

पारस म्हाम्ब्रेचे क्रिकेट करिअर :

पारस म्हाम्ब्रे यांनी भारतासाठी 3 वनडे आणि 2 टेस्ट सामने खेळले असून ज्यात त्याने वनडेत 3 विकेट आणि टेस्टमध्ये 2 विकेट घेतले आहेत. याशिवाय पारस म्हाम्ब्रेने 91 फर्स्ट क्लास सामने खेळले असून यात त्यांनी 284 विकेट घेतले. 

4/6

मुंबई इंडियंसने मुख्य प्रशिक्षकही बदलला :

आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सने मार्क बाऊचरला मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवून महेला जयवर्धनेला हेड कोच केलंय. मार्क बाऊचरच्या कारकिर्दीत संघाचं प्रदर्शन चांगलं नव्हतं. ज्यामुळे त्याला आयपीएल 2025 पूर्वी हटवण्यात आलं. 

5/6

जयवर्धने हे याआधीही मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाला मोठे यश मिळाले होते. मुंबई इंडियन्स मेगा ऑक्शनपूर्वी संघ व्यवस्थापनात अनेक बदल करत आहे.   

6/6

कोणाला रिटेन करणार मुंबई इंडियन्स?

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझी आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतील. तेव्हा मीडिया रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा/ टीम डेव्हिड यांना रिटेन करू शकते.