IPL Playoffs Schedule: कधी, कुठे आणि कसे खेळवले जाणार Playoffs चे सामने? जाणून घ्या सर्व Details

IPL Playoffs Schedule: गुजरात टायटन्सच्या संघाने आयपीएलच्या यंदाच्या पर्वात पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याने 14 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 20 गुणांसहीत पहिल्या स्थानी असलेल्या गुजरातने मागील वर्षी आपल्या पहिल्याच पर्वात आयपीएलचा चषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफ्सचे सामने नेमके कसे होणार आहेत पाहूयात...  

| May 22, 2023, 10:39 AM IST
1/10

IPL Playoffs Schedule

आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच 16 व्या पर्वातील बाद फेरीमधील सामने पूर्ण झाले आहेत. 70 सामन्यानंतर प्लेऑफ्ससाठी 4 संघ पात्र ठरले आहेत. बाद फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं.

2/10

IPL Playoffs Schedule

मुंबईला फायदा - गुजरातविरुद्धच्या पराभवामुळे विराट कोहलीच्या दमदार शतकानंतरही आरसीबीची टीम आयपीएल 2023 च्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. आरसीबीच्या पराभवाचा फायदा मुंबई इंडियन्सला झाला असून मुंबईचा संघ नेट रनरेटच्या जोरावर प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला आहे. 

3/10

IPL Playoffs Schedule

टॉप 4 मध्ये कोण? पॉइण्ट्स टेबलमध्ये गुजरात वगळता चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबईच्या संघाचा समावेश आहे. या तिन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत.

4/10

IPL Playoffs Schedule

पहिला सामना गुजरात विरुद्ध चेन्नई -  आता प्लेऑफ्सबद्दल बोलायचं झाल्यास पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिग्जसचे संघ एकमेकांविरोधात खेळतील.

5/10

IPL Playoffs Schedule

कुठे खेळवला जाणार हा सामना? चेन्नईच्या होम ग्राऊण्डवर म्हणजेच चेपॉकच्या मैदानावर हा क्वालिफायर-1 चा सामना खेळवला जाणार आहे. गुजरात आणि चेन्नईचा सामना 23 मे रोजी खेळवला जाणार आहे. 

6/10

IPL Playoffs Schedule

एलिमीनेटर सामना कधी आणि कुठे? आयपीएलचा एलिमीनेटर सामना हा लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघांदरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना 24 मे रोजी चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावरच खेळवला जाणार आहे.

7/10

IPL Playoffs Schedule

तो संघ पडणार बाहेर- एलिमीनेटरमध्ये पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर पडणार आहे. तर क्वालिफायर-1 मध्ये जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचणार आहे. 

8/10

IPL Playoffs Schedule

पराभूत संघाला मिळणार दुसरी संधी - म्हणजेच गुजरात किंवा चेन्नईचा संघ क्वालिफायर-1 मधून अंतिम सामन्यात पोहचले. या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला क्वालिफायर-2 खेळण्याची संधी मिळणार आहे.  

9/10

IPL Playoffs Schedule

क्वालिफायर-2 चा सामना कधी आणि कुठे? क्वालिफायर-2 मध्ये क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ एलिमीनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध खेळणार आहे. क्वालिफायर-2 चा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर 26 मे रोजी खेळवला जाणार आहे.

10/10

IPL Playoffs Schedule

अंतिम सामना कधी - यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना हा 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे. गुजरात क्वालिफायर-1 मध्ये विजयी झाला तर किंवा क्वालिफायर-2 मध्ये विजयी झाला तर त्यांना घरच्या मैदानावर हा सामना खेळता येईल. प्लेऑफ्सचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होणार आहेत. या सामन्यांचं लाइव्ह प्रक्षेपण स्टार नेटवर्कबरोबरच जीओ टीव्हीवर पाहता येणार आहे. (सर्व फोटो - सोशल मीडियावरुन आणि बीसीसीआयकडून साभार)