IPL 2023 Auction: मुंबई इंडियन्समधील 'हे' आहेत महागडे खेळाडू; इशान किशनचा मोडला रेकॉर्ड

IPL 2023 Auction: आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने तब्बल 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. यावेळी तो मुंबई इंडियन्स टीमच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

Dec 24, 2022, 23:28 PM IST
1/5

आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने सॅम करणला 18.50 कोटींमध्ये खरेदी करून नवा रेकॉर्ड केला. यावेळी मुंबई इंडियन्सनेही त्यांचा जुना रेकॉर्ड मोडीत काढत कॅमेरून ग्रीनला विक्रमी किंमतीत विकत घेतलंय. मुंबईच्या सर्वात महागड्या खेळाडूंवर टाकूया नजर

2/5

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्रीनवर सुरुवातीपासूनच मोठी लागणार अशी अपेक्षा होती. आयपीएल लिलावात ग्रीनची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. मुंबईने ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेत त्यांचा मागील रेकॉर्ड मोडला.

3/5

इशान किशन या युवा फलंदाजाला मुंबईने 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलेलं या ऑक्शनमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरला.

4/5

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दीर्घकाळ मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू होता. रोहितला 2011 च्या मेगा लिलावात मुंबईने 9.2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. रोहितचा विक्रम ईशानने अखेर मोडला.

5/5

अष्टपैलू कृणाल पांड्याला 2018 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईने 8.8 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतलं होतं. त्यानंतर तो सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू होता.