अष्टविनायक यात्रेतील आठही क्षेत्रांच्या दंतकथा आणि इतिहास जाणून घ्या

भारतातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र समूहांपैकी एक म्हणजे अष्टविनायक . या अष्टविनायकातील आठही मंदिरांबद्दल अनेक दंतकथा आहेत . त्यांचा इतिहासदेखील फार रंजक आहे.

Sep 07, 2024, 08:18 AM IST

महाराष्ट्रात अष्टविनायकांना फार महत्त्व आहे . फक्त महाराष्ट्रातील नाही तर संपुर्ण भारतातील भक्त अष्टविनायकांची यात्रा करायला जातात. अष्टविनायक या संस्कृत शब्दाचा अर्थ 'आठ गणपती' असा आहे. आठही मंदिरांतील मुर्त्या नाविण्यपुर्ण आहेत आणि प्रत्येक मंदिराला स्वतःचा वेगळा इतिहास आहे. प्रत्येक देऊळातील गणेशाची सोंड ही भिन्न आहे.अष्टविनायक यात्रा साधारणपणे 3 दिवसांची असते. या अष्टविनायकांची मंदिरे कधी आणि कशी स्थापन केली गेली हे जाणुन घेऊया.

1/8

श्री मयुरेश्वर मंदिर, मोरगाव

पुणे जिल्ह्यातील मोरगावी अष्टविनायकांपैकी 'पहिल्या' गणपतीचे मंदिर आहे.  'सुभेदार गोळे' यांनी हे मंदिर बांधले. मंदिर फार प्रशस्त असून मंदिराच्या बाजूला 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे .मुघल काळात आक्रमणांपासून वाचण्यासाठी मंदिराचा आकार मशिदीसारखा आहे. असे मानले जाते की, सिंधू नावाच्या राक्षताने उच्छाद मांडला होता . त्याचा नाश करण्यासाठी गणपती मयूरावर बसून आला आणि राक्षसाचा वध केला. मंदिरा समोर एक नंदीची मूर्ती आहे असे म्हणतात, की शंकराच्या मंदिरात तो नंदी रथातून घेऊन जात असताना, त्या रथाचे चाक तुटले आणि नंदीला तेथेच ठेवण्यात आले. मोऱ्या गोसाव्याने या मंदिराचा वसा घेतला होता.  

2/8

श्री चिंतामणी मंदिर, थेऊर

यात्रेतील दुसरे ठीकाण म्हणजे थेऊरचा चिंतामणी . श्रीधरणीधर महाराज यांनी प्रथम मंदिर बांधले नंतर पेशव्यांनी भव्य मंदिर उभारले. त्याकाळी हे बांधण्यास 40 हजार लागले. वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशवे क्षयरोगाने आजारी पडले आणि याच मंदिरात त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. त्यांच्या स्मरर्णार्थ मंदिरात बाग बनवली. पेशव्यांना परराष्ट्रीयांनी 2 पितळी घंटा दिल्या त्यातील एक या मंदिरात पहायला मिळते. मूर्ती स्वयंभू आणि डाव्या सोंडेची आहे.

3/8

सिद्धिविनायक (सिध्दटेक)

अहमदनगर जिल्ह्यातील हे मंदिर जागृत देवस्थान मानले जाते . हा अष्टविनायकांपैकी एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे. उजव्या सोंडेचा गणेश फारच शक्तीशाली मानला जातो. असे सांगितले जाते की, मधु आणि कैटभ या दानवांना पराभूत करण्यात विष्णू असफल झाले त्यांनी शंकराला कारण विचारल्यावर शंकर म्हणाले , तुम्ही लढीईआधी गणेशाचे दर्शन घेयला विसरलात. त्यामुळे विघ्ने आली. मग विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि ते लढाई जिंकले. विष्णूंनी जेथे सिद्धी प्राप्त केली ते हे सिध्दटेक. मंदिराचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे. 

4/8

महागणपती ,रांझणगाव

यात्रेतील चौथा गणपती म्हणजे रांझणगावचा महागणपती. मंदिराची बांधणी फार वैशिष्यपूर्ण आहे दक्षिणायान आणि उत्तरायणाच्यादरम्यान मूर्तीवर सूर्यकिरण पडतील अश्याप्रकारे मांडणी केली आहे. मूळ मूर्तीला 'महोत्कट' असे नाव आहे. बाहेर दिसणारी मूर्ती दर्शनी असून मूळ मूर्ती तळमंदिरात आहे , मूर्तीला 10 सोडा व वीस हात आहेत असे म्हणतात. मंदिर दिसायला फार सामान्य आहे .याचा सभामंडप सरदार किबे यांनी आणि गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे.   

5/8

विघ्नेश्वर , ओझर

काही जणं ओझर सातव्याक्रमांकाचे क्षेत्र मानतात तर काही पाचव्या .हा भाविकांची विघ्ने हरतो म्हणून विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे नाव पडले. हे देवस्थान अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंत आहे. 1785 ला चिमाजी आप्पांनी हे देऊळ बांधले आणि त्यावर सोन्याचा कळस चढवला. असे सांगितले जाते की, विघ्नासूर सर्व यज्ञांत विघ्ने घालत होता. त्याला थांबवण्यासाठी ऋषीमूनींनी गणेशाला विनंती केली. पराभूत झाल्यावर असूर गणपतीला शरण गेला. त्यावर गणपतीने माझे नाव ज्या-ज्या ठिकाणी घेतले जाईल, तिथे तू येयचं नाही या अटीवर त्याला सोडले. पण विघ्नासूराने तुमच्या आधी माझे नाव घेतले जावे आणि तुम्ही येथेच वास्तव्य करावे, अशी विनंती केली आणि गणपतीने ते मान्य केले.

6/8

गिरीजात्मज लेण्याद्री

जुन्नरजवळच्या लेण्याद्रीमधील 8व्या गुहेत गिरीजात्मजाचे देऊळ आहे. 307 पायऱ्या चढून गेल्यावर गणेशाचे दर्शन होते. एका अखंड दगडात हे मंदिर बनवण्यात आले आहे. या लेणीचे नाव कपिचित बुद्ध लेणी होते कारण या लेणीत भरपूर वानरे असायची , पालीमध्ये कपि म्हणजे वानर आणि चित म्हणजे एकत्र राहणे. असे म्हणतात या गूहेत पार्वतीने तपश्चर्या केली होती आणि म्हणून एका गणेश भक्ताने गूहेत मूर्ती कोरली .  

7/8

वरदविनायक , महड

रायगड जिल्ह्यातील महड गावी यात्रेतील पुढील मंदिर वसलेले आहे. मंदिराचा गाभारा पेशवेकालीन आणि हेमाडपंथी आहे. मूर्ती स्वयंभू असून, 1690  ला धोंडू पौढकर यांना तलावात मिळाली.1725 ला सुभेदार रामजी भिवळकरांनी देऊळ बांधले. हे मंदिर साधे कौलारु असून कळस सोनेरी आहे.

8/8

बल्लाळेश्वर , पाली

गणेश पुराणात या गणपतीचा उल्लेख 3रा गणपती म्हणून केला आहे. मूळ मंदिर लाकडी होते, नाना फडणवीसांनी मंदिराचे रुपांतर दगडी मंदिरात केले. मूर्तीचे डोळे हीऱ्यांचे आहेत. मंदिराची दंतकथा अशी आहे की,पालीत राहणाऱ्या कल्याण नामक व्यापाऱ्याला बल्लाळ नावाचा पुत्र झाला. तो सतत गणेशाची उपासना करायचा, मात्र हे कल्याणला आवडायचे नाही. एकदा रागाच्या भरात त्याने बल्लाळला सोट्याने झोडले आणि त्याला तसेच सोडून दिले. गणेश त्याच्या मदतीस आल्यावर बल्लाळने त्याला पालीतच राहायला सांगितले आणि गणेशाने ते मान्य केले.