आजच्या 1 कोटी रुपयांची किंमत 2050 साली किती असेल? आकडा पाहून बसेल मोठा धक्का

1 crore Rupees Investment Values In 2050 Year: गुंतवणूक करताना अनेकदा भविष्यात पैशाचं मूल्य कमी होणार आहे असं सांगितलं जातं. त्यामुळेच जास्ती जास्त पैसा गुंतवल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल असंही सांगितलं जातं. मात्र खरोखरच 2050 साली आजच्या 1 कोटींची किंमत किती असेल तुम्हाला माहितीये का? बरं ही पैशांची किंमत का आणि कशी कमी होतेय? पाहूयात...

| Oct 08, 2024, 16:32 PM IST
1/10

moneypirce

महागाईच्या दराचा विचार करता 1 कोटी रुपये आज गुंतवले तर त्याचं मूल्य 2050 साली किती असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? खरं तर ही आकडेमोड पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एका कोटीचं मूल्य एवढं कमी होऊ शकतं यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. चला समजून घेऊयात हे गणित...

2/10

moneypirce

आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी भविष्यात पैसा उपयोगी पडावा म्हणून गुंतवणूक करत असतो. अर्थात तारुण्यामध्ये गुंतवणुकीचं महत्त्व लवकर लक्षात आलं नाही तरी वय वाढतं जातं तसं गुंतवणूक किती महत्त्वाची आहे हे समजू लागतं.

3/10

moneypirce

वाढत्या वयाबरोबरच कर्ज,गुंतवणूक, व्याज, परतावा यासारख्या गोष्टी अगदी दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. आज तर अगदी पहिल्या नोकरीपासूनच तरुण गुंतवणुकीचा विचार करताना दिसतात. मग एसआयपी, म्युच्यूअल फंड वगैरेसारख्या माध्यमांचा विचार केला जातो. 

4/10

moneypirce

नेहमी गुंतवणूक करताना आता केलेली गुंतवणूक महागाईचा दर आणि वाढत्या महागाईच्या तुलनेत अमुक एका वर्षी किती मूल्याची असेल असं समजावून सांगितलं जातं. म्हणजेच महागाईचा दराचा विचार केल्यास आजचे 1 कोटी अजून 10 वर्षांनंतर किती मूल्याचे असतील किंवा त्या वेळी त्या पैशांमध्ये आजच्या तुलनेत किती मूल्याच्या सुविधा वस्तू घेता येतील याचा अंदाज बांधला जातो.  

5/10

moneypirce

महागाईच्या दरामुळे पैशांची किंमत कमी होत जाते. उदाहरण घ्यायचं झालं तर 1950 मध्ये सोन्याचं दर 99 रुपये तोळा इतके होते. आज हा दर 78 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. म्हणजेच 1950 मध्ये महिना 200 रुपये कमवणाऱ्याला तशीच लाईफस्टाइल आज जगायची असेल तर महिन्याला किमान 1.5 लाख रुपये पगार असणं आवश्यक आहे. इन्फेशनमुळे खरेदी करण्याची क्षमता कमी होते, असं म्हणता येईल.  

6/10

moneypirce

आधी महागाईचा दर म्हणजेच इन्फ्लेशन म्हणजे काय ते समजून घेऊयात. इन्फ्लेशनमुळे पैशांचं मूल्य काळानुरुप कमी होतं असं सोप्या भाषेत म्हणता येईल. म्हणजे 20 वर्षापूर्वी तुम्हाला 100 रुपयामध्ये ज्या वस्तू मिळायच्या तितक्या वस्तू घेण्यासाठी आज तुम्हाला नक्कीच अधिक पैसा मोजावा लागतोय. भारतामधील महागाईचा दर हा वर्षाला 5 ते 6 टक्के आहे. मागील 10 वर्षांपासून याच आकडेवारीमध्ये महागाई वाढतेय.  

7/10

moneypirce

आता हाच विचार करुन आजच्या 1 कोटी रुपयांचं मूल्य किती असेल हे पाहूयात. तर अजून 10 वर्षांमध्ये महागाईचा दर वर्षाला 6 टक्के राहिला तर 2034 ते 2035 पर्यंत आजच्या एक कोटीची किंमत तेव्हा 55.84 लाख इतकी असेल.  

8/10

moneypirce

अशीच आकडेमोड 20 वर्षांसाठी केली तर आजच्या एक कोटीचं मूल्य तेव्हा 31.18 लाख रुपये इतके असेल.   

9/10

moneypirce

2050 साली आजच्या एक कोटीचा विचार केला तर त्याचं मूल्य अगदी 17.41 लाखांपर्यंत खाली आलेलं असेल.  

10/10

moneypirce

महागाईच्या दराचा विचार केला तर 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 सालातील एका कोटीची किंमत आज 38 लाख रुपये इतकी आहे.