हे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?

Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे. 

Aug 28, 2024, 11:24 AM IST

Indian Railway Unique Railway Stations:  देशातील अनेक राज्यांना जोडण्याचं काम या रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येतं. 

1/7

प्रवासी

Indian railway these railway stations does not have any name know the places travel news fun facts

Indian Railway Unique Railway Stations: भारतीय रेल्वे... असा फक्त उच्चार जरी केला तरी रेल्वेची रोजची धडधड, असंख्य प्रवासी, प्रवासाची कारणं आणि प्रवासाठी ठिकाणं अशी चित्र डोळ्यापुढे उभी राहतात. अशा या रेल्वेबाबत काही गमतीशीर आणि रंजक गोष्टीसुद्धा आहेत.   

2/7

भारतीय रेल्वे

Indian railway these railway stations does not have any name know the places travel news fun facts

भारतीय रेल्वे देशातील विविध राज्य आणि विविध गावांमध्ये थांबे घेत पुढे जाते. पण, देशात अशी दोन रेल्वे स्थानकं आहेत, ज्यांना कोणतं नावच नाहीय. माहितीये का?   

3/7

नावच नाही

Indian railway these railway stations does not have any name know the places travel news fun facts

नावच नाही, मग ते रेल्वे स्थानक कसलं? तुम्हालाही प्रश्न पडला ना? पण, हे खरंय. भारतात अशी दोन रेल्वे स्थानकं आहेत ज्य़ांना प्रत्यक्षात कोणतंही नाव नाहीय. 

4/7

पश्चिम बंगाल

Indian railway these railway stations does not have any name know the places travel news fun facts

पश्चिम बंगाल आणि झारखंड इथं ही रेल्वे स्थानकं आहेत. यातचं पहिलं रेल्वे स्थानक प. बंगालमधील बर्धमान जिल्ह्यात आहे. रैना आणि रैनागढ या दोन गावांमध्ये हे स्थानक असून, सुरुवातीला त्याला रैनागढ असं नाव देण्यात आलं होतं.   

5/7

रैना

Indian railway these railway stations does not have any name know the places travel news fun facts

रैना गावातील नागरिकांनी या निर्णयाचा विरोध केला, कारण हे स्थानक रैना गावातील भूखंडावर स्थित होतं. हा वाद पाहता अखेर या रेल्वे स्थानकाचं नाव हटवण्यात आलं आणि तिथपासून हे स्टेशन नावाशिवाच तिथं उभं आहे. 

6/7

झारखंड

Indian railway these railway stations does not have any name know the places travel news fun facts

नाव नसणारं दुसरं स्थानक झारखंडमध्ये असून, ते रांचीहून टोरी इथं जाणाऱ्या रेल्वेमार्गावर उभारण्यात आलं आहे. बडकीचांपी असं नाव या स्थानकाला देण्यात येणार होतं. पण, कमले गावातील नागरिकांना या स्थानकाला विरोध केला आणि तिथपासून या स्थानकाला कोणतंही नाव देण्यात आलं नाही.   

7/7

गैरसोय

Indian railway these railway stations does not have any name know the places travel news fun facts

वरील दोन्ही स्थानकांना नावं देण्यात आली नसल्यामुळं प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो. तिकीट आरक्षण करताना किंवा स्थानकाची ओळख सांगताना त्यांची तारांबळ उडते.