बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

Feb 27, 2019, 11:19 AM IST
1/5

बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी म्हणून भारतीय वायुदलाकडून 'एअर स्ट्राईक' करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याला गाफील ठेवत करण्यात आलेल्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी सहंघटनेच्या तळांचा नायनाट करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय वायुदलाकडून १२ मिराज २०००च्या ताफ्याची मदत घेण्यात आली होती. विमानांच्या या ताफ्यात 'अॅडव्हांस वॉर्निंग' आणि 'कंट्रोल सिस्टिीम' असणाऱ्या 'नेत्रा' या एअरक्राफ्टचाही समावेश होता. शिवाय 'सुखोई'चा आधारही या ताफ्याला होता. एकिकडे या हल्ल्यातील योगदानासाठी 'मिराज'ची वाहवा होत असताना 'नेत्रा' आणि 'सुखोई'ला विसरुन चालणार नाही.  (छाया सौजन्य- पीटीआय)

2/5

बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

'नेत्रा' खऱ्या अर्थाने त्याचा कटाक्ष शत्रूवर ठेवून होतं असं म्हणायला हरकत नाही. 'मिराज'च्या ताफ्याला मार्गदर्शन करण्यासोबतच काळोखात सुरु असणाऱ्या या कारवाईमध्ये ते पाकिस्तानी लष्लकाराच्या हालचालींवरही इतकच नव्हे तर, त्यांच्या संभाषणावरही लक्ष ठेवून होतं. (छाया सौजन्य- डीआरडीओ)

3/5

बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

संपूर्ण भारतीय बनावटीच्या नेत्रामध्ये सैन्याला युद्धभूमीवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वापरण्यात आलं. ज्यामुळेच खऱ्या अर्थाने ही मोठी कारवाई करता आली. २००७ मध्ये डीआरडीओकडून 'नेत्रा'ची निर्मिती करण्यास सुरुवात करण्यात आली. २०१७ मध्ये एका दशकानंतर जवळपास २ हजार ४६० कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चात 'नेत्रा- आय इन द स्काय' म्हणजेच आकाशातूनही शत्रूवर चौकस नजर ठेवणार 'नेत्रा' देशाच्या संरक्षणार्थ रुजू झालं. (छाया सौजन्य- डीआरडीओ)

4/5

बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

२०० किमीच्या कक्षेपर्यंतच्या जमिन, पाणी आणि हवेत असणाऱ्या शत्रूच्या प्रत्येक हाचलाची 'नेत्रा' अचूकपणे हेरतं. डीआरडीओच्या माहितीनुसार शत्रूची सीमा न ओलांडता साडेचारशे ते पाचशे किमी अंतरापर्यंतचा निशाणाही नेत्राला अचूकपे गवसतो. हवेत असतेवेळी ते १२० अंश परिसराचं चित्र समोर मांडू शकतं. यामध्ये कोणत्याही प्रकारची कॅमेरा प्रणाली नाही. पण, सर्व इलेक्ट्रॉनिक सिग्नल आणि त्यांची हालचाल हेरण्यात 'नेत्रा' तरबेज आहे. (छाया सौजन्य- संरक्षण मंत्रालय)

5/5

बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान

एका टप्प्यात 'नेत्रा' पाच तासांसाठी उड्डाण भरू शकतं. त्याशिवाय या एअरक्राफ्टमध्ये हवेतल्या हवेत इंधन भरल्यानंतर सलग नऊ तासांसाठी ते हवेतच राहण्याची क्षमताही आहे. सध्याच्या घडीला भारतीय वायुदलात दोन नेत्रा विमानांचा समावेश आहे. तिसऱ्या 'नेत्रा'चाही वायुदलात लवकरच समावेश होणार असून, डीआरडीओमध्ये सध्या त्याच्या तपासणी चाचण्या सुरु असून ते अद्ययावत तंत्रज्ञानांने परिपुर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचं कळत आहे. (छाया सौजन्य- पीटीआय)