IND vs NZ : न्यूझीलंडला हरवत टीम इंडियाने स्वतःच्या नावे केला नवा रेकॉर्ड!

IND vs NZ : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये आज न्यूझीलंड विरूद्ध भारत (IND vs NZ) यांच्यातील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने न्यूझीलंडवर मोठा विजय (team india beat new zealand) मिळवला आहे.

Jan 21, 2023, 20:22 PM IST
1/5

या विजयासह टीम इंडियाने तीन वनडे सामन्यांची सीरिज 2-0 अशी जिंकली आहे. यासह भारताने एक नवा रेकॉर्ड देखील केला आहे.

2/5

भारताने आतापर्यंत घरच्या मैदानावर सलग 7 वनडे द्विपक्षीय सीरिज जिंकण्याचा विक्रम केलाय. टीम इंडियाने 2019 ते 23 पर्यंत घरच्या मैदानावर सलग सात वनडे मालिका जिंकल्या आहेत. या प्रकरणात त्याने आपलाच जुना रेकॉर्ड मोडलाय.

3/5

टीम इंडियाने 2009 ते 2011 या कालावधीत घरच्या मैदानावर सलग सहा वनडे सीरिज जिंकल्या होत्या.

4/5

2013 ते 2014 पर्यंत टीम इंडियाला घरच्या मैदानावर सलग पाच द्विपक्षीय वनडे सीरिज जिंकलीये.

5/5

ऑस्ट्रेलियाने 2019 मध्ये घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा पराभव केला होता.