Photos: भारत विरुद्ध इंग्लंड पुढचा सामना राजकोटवर;कोण मारणार बाजी

India vs England 3rd Test: इंग्लंडने हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला विजय खेचून आणला. 15 फेब्रुवारीला तिसरा कसोटी सामना  होणार आहे.  हा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.   

Feb 14, 2024, 17:24 PM IST

 

 

1/7

15 फेब्रुवारीला तिसरा कसोटी सामना  होणार आहे. याआधी झालेल्या दोन कसोटी सामन्यात दोन्ही संघाचा 1-1 असा विजय झाला होता. त्यामुळे आता होणारा  हा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.   

2/7

भारत आणि इंग्लंडमध्ये होणारा पुढील कसोटी सामना हा राजकोटच्या स्टेडियमवर होणार आहे. 

3/7

2016 मध्ये राजकोटच्या स्टेडियमवर  भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यांत दोन्ही संघाच्या धावा समान असल्याने सामना ड्रॉ करण्यात आला.

4/7

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी , श्रेयस अय्यर दुखापतीमुळे तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. असं असलं तरी युवा खेळाडूंना  तिसऱ्या सामन्यासाठी लॉटरी लागणार असल्याची शक्यता आहे.

5/7

शेवटच्या तीन सामन्यांसाठी रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप हे खेळाडू असणार आहेत. 

6/7

भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा राजकोटला होणार असून चौथा सामना रांची तर पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे होणार आहे.   

7/7

दमदार खेळाडूंच्या अनुपस्थितीत  इंग्लंडविरुद्धच्या हा सामना आव्हानात्मक असून  भारत हे आव्हान कसे पेलतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.