राज्यात शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश; पहिली ते बारावी पर्यंतच्या वर्गात समावेश

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार. पहिली ते बारावीपर्यंत शेतीविषयक धडे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची झी २४ तासला एक्सक्लुसिव्ह माहिती.

Apr 26, 2023, 00:18 AM IST

Maharashtra Education : राज्यात शालेय शिक्षणात आता कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. पहिली ते १२ वी पर्यंत हा विषय शिकवण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. शेतीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी हे धोरण राबवण्यात येणार आहे. 

1/5

कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल  शिक्षण विभागाने कृषिमंत्री यांच्याकडून स्वीकारला आहे.

2/5

यामुळे शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव व संवेदनशीलता निर्माण होईल.

3/5

शहरी भागात जागा नसेल तर टेरेस वर परस बाग बनवण्याच्या सूचना.

4/5

प्रात्याक्षिक शेती अभ्यास साठी परस बाग प्रत्येक शाळेसाठी अनिर्वाह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

5/5

शेती हा विषय कॉलेज मध्ये घेतल्यास त्याला एक पदवी देण्याची तरतूद ही करण्याचेही विचाराधीन आहे.