मध्यरात्री 'या' मंदिरातील मूर्ती बोलू लागतात? काय आहे या मंदिरातील रहस्य?

भारतात अनेक मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. भारतात बिहारच्या पवित्र भूमीवर अनेक प्राचीन रहस्यमय मंदिरे आहेत. रहस्यमय कथांमुळे हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. 

| Apr 12, 2024, 18:20 PM IST
1/7

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एक मंदिर आहे. लोक त्रिपुरा सुंदरी मंदिरात आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. 

2/7

या मंदिरात अनेक देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. या मंदिराबद्दल असं म्हटलं जातं की, या मंदिरातील मूर्ती एकमेकांशी संवाद साधतात.

3/7

पौराणिक मान्यतेनुसार, त्रिपुरा सुंदरी मंदिराविषयी अनेकांना माहिती आहे की, तिथल्या येथील मूर्ती एकमेकांशी बोलतात. ज्याबद्दल आजपर्यंत कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही. 

4/7

स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार, की अमावस्येच्या मध्यरात्री या मंदिरातून काही आवाज येतात. काही वेळाने हे आवाज एकमेकांशी बोलत असलेल्या मूर्तींचे असल्याचा दावा केला जातो.

5/7

हे रहस्य शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केलं. यानंतरही हे रहस्य आवाज कुठून येतात हे समजलं नाही. 

6/7

हे गूढ उकलण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक तंत्रांचा अवलंब करण्यात आला होता. 

7/7

त्रिपुरा सुंदरी मंदिर सुमारे 400 वर्षे जुने असून तांत्रिक भवानी मिश्र यांनी या मंदिरात देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित करून कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे मूर्ती जागृत झाल्या होत्या.