भविष्यात ब्लॅकहोलचा वापर बॅटरीसारखा करणं शक्य; संशोधकांचा मोठा दावा

भविष्यात मानव ब्लॅकहोलचा वापर बॅटरीसारखा करणार आहे. संशोधकांनी याबाबत मोठा दावा केला आहे.  

Dec 13, 2023, 21:01 PM IST

Black Hole News:  ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. या ब्रम्हांडातील न उलगडलेले रहस्य म्हणजे ब्लॅकहोल. ब्लॅकहोल मधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करुन उर्जानिर्मीती करण्याचा संशोधकांचा प्रकल्प आहे.

1/7

ब्लॅकहोल हे अंतराळातील सर्वात मोठे रहस्य आहे. संशोधकांनी अनेक ब्लॅकहोल शोधले आहेत. मात्र, अद्याप यांचा उलगडा झालेला नाही. 

2/7

 ब्लॅकहोल मधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करुन अणुबॉम्बच्या 250 पट ऊर्जा निर्माण करता येवू शकते. 

3/7

ब्लॅकहोल मधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करण्याच्या प्रक्रियेला सुपररेडियन्स असे नाव देण्यात आले आहे.  स्पेस-टाइम सिद्धांतावर आधारित ही संकल्पना आहे. 

4/7

 ब्लॅकहोल मधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा कशा प्रकारे यावर संशोधन सुरु असल्याचे  झान फेंग माई म्हणाले.   

5/7

पेकिंग युनिव्हर्सिटीच्या कावली इन्स्टिट्यूट फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्सच्या झान फेंग माई याबाबतचा दावा केला आहे. 

6/7

भविष्यात ब्लॅकहोलचा वापर बॅटरीसारखा केला जाऊ शकतो. 

7/7

ब्लॅकहोलमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण असते.  ब्लॅकहोल सर्वकाही आपल्याकडे खेचून घेते.