Mumbai Weather Updates: मुंबईकरांनो सावधान! उद्या पावसाचा रेड अलर्ट; शाळांना सुट्टी जाहीर

Mumbai Weather Alert: मुंबईत खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 26, 2023, 21:28 PM IST
1/5

अति मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) वतीने, मुंबई (Mumbai) महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (Red Alert) इशारा दिला आहे. 

2/5

महानगरपालिका आयुक्तांचा निर्णय

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

3/5

शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

4/5

गरज असेल तरच घराबाहेर पडा

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

5/5

स्कूल बस बंद

दरम्यान, अतिमुसळधार पावसात स्कूल बस चालवणार नाही, असं शाळा आणि पालकांना स्कूल बस असोसिएशनने हा निर्णय कळवला होता.