7.49 लाखांच्या 'या' SUV ने ग्राहकांना लावलं वेड; एका दणक्यात 6 लाख गाड्यांची विक्री

कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सेगमेंट भारतीय मार्केटमध्ये वेगाने वाढत आहे. कमी किंमत आणि जास्त मायलेज यामुळे लोकांना या सेगमेंटमधील कार आवडतात.   

| Nov 18, 2024, 15:57 PM IST

कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सेगमेंट भारतीय मार्केटमध्ये वेगाने वाढत आहे. कमी किंमत आणि जास्त मायलेज यामुळे लोकांना या सेगमेंटमधील कार आवडतात. 

1/10

कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सेगमेंट भारतीय मार्केटमध्ये वेगाने वाढत आहे. कमी किंमत आणि जास्त मायलेज यामुळे लोकांना या सेगमेंटमधील कार आवडतात.   

2/10

याच सेंगमेंटमधील एसयुव्हीने सर्वांना वेड लावलं आहे. लाँच झाल्यापासून या कारच्या 6 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.   

3/10

आपण येथे Hyundai Venue कारबद्दल बोलत आहोत. या एसयुव्हीला मे 2019 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आलं होतं. गेल्या साडे पाच वर्षात या कारच्या 6 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.   

4/10

भारतीय बाजारात हुंडाईची ही सर्वाधिक विक्री झालेली दुसरी कार आहे. पहिल्या क्रमांकावर क्रेटा आहे. क्रेटाच्या 11 लाख युनिट्सची विक्री झाली आहे.   

5/10

हुंडाई वेन्यूला जेव्हा लाँच करण्यात आलं होतं तेव्हा फक्त 6 महिन्यात 50 हजार युनिट्सची विक्री झाली होती. यानंतर 1 लाखांपर्यंत पोहोचण्यास 15 महिने लागले.   

6/10

लाँच झाल्यानंतर 25 महिन्यात वेन्यूने 2 लाखांच्या विक्रीची नोंद केली होती आणि 36 महिन्यात 3 लाखांपर्यंत पोहोचले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये 5 लाख युनिट्सची विक्री झाली होती, जी या नोव्हेंबरपर्यंत 1 लाखाने वाढून 6 लाख झाली आहे.   

7/10

Venue एकूण 26 वेगवेगळ्या ट्रीममध्ये पेट्रोल-इंजिनसह येते. यामध्ये 3 इंजिनचा पर्याय मिळतो.   

8/10

ज्यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल, 1.0 लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनचा पर्याय आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्यूअल, 6 स्पीड मॅन्यूअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येतं.   

9/10

याच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.94 लाख आणि डिझेल व्हेरियंटची किंमत 10.71 लाखांपासून सुरु होते.   

10/10

या एसयुव्हीत रेअर एसी वेंट्स, पार्किंग सेन्सर, सनरुफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, ड्रायव्हिंग मोड क्रूझ कंट्रोल, ADAS, पॉवर्ड फ्रंट सीट सारखे फिचर्स मिळतात.