बलात्काराच्या सीनमध्ये अभिनेत्याने जे केलं त्यानंतर रात्रभर थरथरत होती हुमा कुरेशी

Huma Qureshi: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री हुमा कुरेशीने (Huma Qureshi) आपल्या अभिनय कौशल्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. पण एका चित्रपटात बलात्कार सीन (Rape Scene) शूट केल्यानंतर हुमा कुरेशी प्रचंड घाबरली होती. त्यानंतर ती भितीने अक्षरश: थरथरत होती.   

Mar 14, 2023, 19:51 PM IST
1/6

Huma Qureshi: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान एका चित्रपटाच्या शुटिंगनंतर हुमा कुरेशी प्रचंड घाबरली होती. हुमा कुरेशी भीतीने अक्षरश: थरथरत होती.   

2/6

हा किस्सा 'बदलापूर' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा आहे. या चित्रपटातील हुमाच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. चित्रपटात हुमाने एका सेक्स वर्करची भूमिका निभावली होती. चित्रपटात हुमा कुरेशीवर बलात्कार झाल्याचा एक सीन होता.  

3/6

या सीनबद्दल बोलताना हुमाने सांगितलं होतं की "या सीनदरम्यान आपल्याला मानसिक धक्का बसला होता. कारण आपण एक महिला असून, त्या सीनमध्ये जे काही सुरु होतं त्यामुळे आपल्याला फार वाईट वाटत होतं". या सीनचा हुमा कुरेशीवर प्रचंड मोठा परिणाम झाला होता.   

4/6

"मी चित्रपटात एका सेक्स वर्करची भूमिका निभावली होती. लोकांना आपण सेक्स वर्करसह काही करु शकतो असं वाटतं, त्यामुळेच मी हा चित्रपट केला. लोकांना वाटतं त्यांच्यावरही बलात्कार केला जाऊ शकतो," असं हुमाने सांगितलं होतं.  

5/6

"बलात्काराच तो सीन शूट केल्यानंतर आपण घरी यायचो तेव्ही भीतीने थरथर कापत असे," असं हुमाने सांगितलं होतं.   

6/6

दरम्यान, हुमा कुरेशीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास ‘डबल एक्सएल’ चित्रपटात ती शेवटची दिसली होती.