पुण्यातल्या पराभवाने World Test Championship फायनलचं भारताचं स्वप्न भंगलं? आता Qualify होण्यासाठी...

WTC 2023-2025 Team India Chances Of Playing Final After 2nd Defeat Against New Zealand: भारतीय संघाने मागील दीड आठवड्यांमध्ये सलग दोन सामने गमावले आहेत. 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला पाहुण्या संघाने कसोटी मालिकेत घरच्या मैदानांवर पराभूत केलं आहे. या दोन पराभवांनंतर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळू शकेल की नाही? जाणून घ्या कसं आहे WTC चं पॉइण्ट्स टेबल आणि फायनल खेळण्यासाठी भारताला काय करावं लागणार आहे.

Swapnil Ghangale | Oct 27, 2024, 12:32 PM IST
1/14

indiawtcfinal2025

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये केवळ पहिल्या स्थानी राहून भागणार नाही. जाणून घ्या भारतासाठी पुण्यातील पराभवानंतर आता  कसं आहे फायनलचं गणित...

2/14

indiawtcfinal2025

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेली कसोटी मालिका भारताने शनिवारी गमावली. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये पाहुण्या संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. तब्बल 12 वर्षानंतर पाहुण्या संघाने भारताला भारतात पराभूत करण्याचा पराक्रम नोंदवला आहे.  

3/14

indiawtcfinal2025

न्यूझीलंडने पुण्यातील दुसरा सामना 113 धावांनी जिंकला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिमवरील या सामन्यात संघाच्या सुमार फलंदाजीचा फटका भारताला बसला. तिसऱ्या दिवशीच पाहुण्यांनी हा सामना जिंकला. न्यूझीलंडने यापूर्वी भारताला भारताच्याच भूमीत कधीच पराभूत केलं नव्हतं.   

4/14

indiawtcfinal2025

भारताने दोन आठवड्यांमध्ये दोन सामने गमावल्याने आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचण्याचा भारताचा प्रवास अधिक खडतर झाला आहे. पुढील वर्षी लंडनमधील लॉर्ड्सवर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी आवश्यक असणारी भारतीय संघाची विजयाची टक्केवारी या दोन पराभवांमुळे कमालीची कमी झाली आहे.

5/14

indiawtcfinal2025

अवघ्या दीड आठवड्यात भारताचे पॉइण्ट पर्सेंटेज हे 74 वरुन 62.82 पर्यंत घसरले आहेत. सलग दोन पराभवांनंतरही भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी कसा पात्र ठरु शकतो ते पाहूयात...  

6/14

indiawtcfinal2025

भारताचा सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव झाला असला तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाबही आहे की भारतीय संघ अजूनही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. भारताच्या खालोखाल या यादीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ असून त्यांचे पॉइण्ट्स पर्सेंटेज हे 62.50 इतके आहेत.  

7/14

indiawtcfinal2025

भारताच्या दोन सलग पराभवांनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं पॉइण्ट्स टेबल असं आहे. 

8/14

indiawtcfinal2025

सध्या भारतीय संघासहीत 9 संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 च्या स्पर्धेत खेळत आहे. अंतिम सामन्याआधी भारतीय संघाचे एकूण 6 कसोटी सामने शिल्लक असून त्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्याचा समावेश आहे. 

9/14

indiawtcfinal2025

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर चषक खेळण्यासाठी लवकरच रवाना होणार आहे. या मालिकेत भारत पाच कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे आता या सहा कसोटीपैकी नेमके किती सामने भारताला जिंकावे लागतील ज्यामुळे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील हे समजून घेऊयात.  

10/14

indiawtcfinal2025

इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून न राहता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उरलेले सर्व म्हणजेच सहाही कसोटी सामने गमवणे फारच महागात पडू शकते. भारताने उरलेले सहाही सामने गमावले तर अंतिम सामना खेळणं हे स्वप्नच राहील. एखादा सामना अनिर्णित राहिला तरी भारताच्या पॉइण्ट्स पर्सेंटेजवर परिणाम होईल.

11/14

indiawtcfinal2025

भारतीय संघ सलग सहा सामने जिंकले तर रोहितच्या नेतृत्वाखालील संघांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठीचे पॉइण्ट्स पर्सेंटेज 74.50 पर्यंत पोहोचतील. तेच एखादा सामना अनिर्णित राहिला तर भारताचे पॉइण्ट्स पर्सेंटेज 71.05 इतके होतील.   

12/14

indiawtcfinal2025

भारताने उरलेल्या सहा सामन्यांपैकी 4 सामने जिंकले तरी त्यांना इतर संघांवर अवलंबून न राहता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळता येईल. चार विजय भारताला अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत.   

13/14

indiawtcfinal2025

मात्र भारतीय संघ मागील दोन कसोटींमध्ये खेळला त्याप्रमाणेच खेळत राहिला तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसारखे संघ भारताच्या पुढे निघून जातील.  

14/14

indiawtcfinal2025

थोडक्यात सांगायचं झालं तर अजून तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची सगळी सूत्र भारताच्या हातातच आहेत. इतर संघांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत:च्या खेळीच्या जोरावर भारत अंतिम सामन्यात खेळू शकतो. रोहित आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संघाचा असाच प्रयत्न असेल.