दादर रेल्वेस्थानकाबाबत ऐतिहासिक निर्णय, 'या' तारखेपासून होणार मोठा बदल

Dadar Railway Station : मुंबईच्या रेल्वे मार्गातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या दादर रेल्वे स्थानकाबाबत रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग जोडणाऱ्या दादर रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यातच लांब पल्ल्याच्या ट्रेनही दादर रेल्वे स्थानकावरुन सुटतात. त्यामुळे दिवसरात्र या स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. 

राजीव कासले | Sep 27, 2023, 21:55 PM IST
1/7

मुंबईतल्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरचं सर्वात महत्त्वाचं रेल्वे स्थानक म्हणजे दादर. या स्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करतात. मध्य-पाश्चिम रेल्वे मार्गाबरोबरच लांब पल्ल्याच्या ट्रेनही दादर रेल्वे स्थानकातून सुटतात. त्यामुळे दिवसरात्र इथं प्रवाशांची गर्दी असते. 

2/7

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गाचे आणि लांब पल्ल्याचे अनेक प्लॅटफॉर्म असल्याने मुंबईत नव्याने आलेल्या प्रवाशांचा हमखास गोंधळ उडतो. इतकंच काय तर कोणत्या रेल्वे स्थानकावर जायचं आहे, याबाबत मुंबईकरही अनेकवेळा फसतो. 

3/7

एखादा प्रवासी दादर रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्याला नेमकं कुठे जायचं आहे हे इतके प्लॅटफॉर्म पाहून त्याचा गोंधळ उडतो.  पश्चिम रेल्वेने जाणारा प्रवासी मध्य रेल्वेच्या तर मध्य रेल्वेने जायचं असणारा प्रवासी पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उतरतो.

4/7

अनेकांना मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वेगवेगळ्या क्रमांकाचे प्लॅटफॉर्म असतात याचीच माहिती नसते. त्यामुळे अनेकवेळा प्रवासी कोणत्याही लोकलमध्ये बसतो आणि आपण चुकलोय हे समजेपर्यंत बराच उशीर झाला असतो. 

5/7

प्रवाशांचा हा गोंधळ टाळण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दादर रेल्वे स्थानकाबाबत हा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आहे. 

6/7

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला आता सरसकट अनुक्रमे क्रमांक देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हे सर्व बदल 9 डिसेंबर पासून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

7/7

म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7 हे पश्चिम रेल्वेसाठी असतील. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ते 14 हे मध्य रेल्वेसाठी असतील. प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.