देवभूमी हिमाचलवर चढला शुभ्र साज

Jan 07, 2019, 09:06 AM IST
1/6

हवामान खात्याच्या शिमला विभागातून असं सांगण्यात आलं की, कुल्लूच्या गोंडोलामध्ये 10.5 सेमी, किन्नोरच्या पूहमध्ये आठ सेमी आणि चंबा जिल्ह्यातील कोठीमध्ये पाच सेमी बर्फवृष्टीची नोंद करण्यात आली. 

2/6

शनिवारी शिमलामध्ये बर्फवृष्टी झाली नाही 

3/6

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केलांग राज्य सर्वाधिक थंडीचा भाग झाला आहे. इथे तापमान शून्य ते सात डिग्री सेल्सियसच्या खाली नोंदवण्यात आलंय.

4/6

शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कल्पामध्ये तापमान शून्य ते दोन डिग्री सेल्सियसपर्यंत नोंदवलं गेलं आहे.

5/6

या दरम्यान डलहौजीमध्ये तापमान शून्य ते 1.1 डिग्री सेल्यियसच्या खाली गेलं असून कुफरीत शून्य ते 0.8 डिग्री सेल्यिसस तापमानाची नोंद झाली आहे. 

6/6

या आठवड्याच्या सुरूवातीला हवामान खात्याने चार ते सगा जानेवारीला 'नारंगी चेतावनी' जाहिर केली होती. राज्यातील अनेक ठिकाणी भरपूर बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.