सगळ्यात जास्त मानधन घेणारी आयटम गर्ल, सुपरस्टार्सच्या कुटुंबात केलं दुसरं लग्न; आता 4 सावत्र मुलांची आई

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अशा अनेक लव्ह स्टोरी आपण पाहिल्या आहेत ज्या अजरामर आहेत असं म्हणता येईल. अनेक अशा आहेत ज्या कोणत्याही चित्रपटाच्या कथेसारख्या आहेत. पण एक अशी लव्ह स्टोरी आहे ज्यात तितकंच दु: ख आणि तितकाच आनंद आहे. एक अशी अभिनेत्री आहे जिनं इंडस्ट्रीमध्ये खूप यश मिळवलं तरी ती चर्चेत असण्याचं कारण तिचं खासगी आयुष्य होतं. ही अभिनेत्री आज 86 वर्षांची आहे. चला तर तिच्याविषयी जाणून घेऊया...  

| Nov 22, 2024, 16:47 PM IST
1/8

या अभिनेत्रीचं सलमान खानच्या कुटुंबाची एक सदस्य आहे. यावरून नक्कीच तुम्हाला एक अंदाज आला असेल की ती कोण असू शकते. तिला खासगी आयुष्यात खूप काही सहण केलं, मग ती गरिबी असो किंवा मग घटस्फोट ते अनेक गोष्टींचा आयुष्यात सामना केला. पण आज तिचं खूप आनंदी आणि सुंदर कुटुंब आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून सलमानची सावत्र आई हेलन आहेत. सलीम खान यांच्या आधी हेलन यांचं लग्न झालं होतं. हेलन यांचं खरं नाव हेलन एन रिचर्डसन आहे. 

2/8

हेलन यांनी आजवर 1000 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले तर काही चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली तर काहींमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. 

3/8

हेलेन यांना त्यांच्या करियरमध्ये 2 फिल्मफेयर पुरस्कार मिळाले. तर 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हेलन या स्वत: उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांनी खूप स्ट्रगल करत करिअरमध्ये यश मिळवलं. 

4/8

हेलन यांचा जन्म बर्मामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव जॉर्ज डेसमियर होतं तर आईचं नाव मर्लिन होतं. हेलन जेव्हा लहान होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आईनं एका ब्रिटिश सैनिकांशी लग्न केलं. दरम्यान, दुसऱ्या विश्व युद्धात हेलन यांच्या सावत्र वडिलांचे निधन झाले. 

5/8

त्यानंतर हेलन यांच्या आईनं नर्स म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एकदा त्यांची भेट बॅकग्राऊंड डान्स करणाऱ्या कुकू मोरेशी झाली. त्यांनी हेलन यांना चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून काम मिळवून दिलं. त्यानंतर हेलन यांनी मागेवळून पाहिलं नाही. 

6/8

हेलन यांच्या 'मेरा नाम चिन चिन चु', 'यम्मा यम्मा', 'ओ हसीना जुल्फो वाली', 'है प्यार का ही नाम' ते 'पिया तू अब तो आजा' सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या आयटम गर्ल ठरल्या. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी सगळे प्रतीक्षा करायचे. 

7/8

हेलन यांनी पहिलं लग्न हे निर्माता आणि दिग्दर्शक प्रेम नारायण अरोरा यांच्याशी केलं. त्या दोघांमध्ये 27 वर्षांचा अंतर होतं. ते दोघं 16 वर्षांचा सुखी संसार केल्यानंतर विभक्त झाले. त्यानंतर हेलन यांनी सलीम खान यांच्याशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या लग्नानंतर पहिली पत्नी सलमान खान, मुलं सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीर खान यांनी त्यांचं हे नात मान्य केलं नव्हतं. मात्र, कालांतरानं त्यांनी हे स्वीकारलं.

8/8

हेलन आणि सलीम खान यांना मुल-बाळ नाही. त्यांनी अर्पिता खानला दत्तक घेतलं आहे. दरम्यान, आजही सलीम खान हे त्यांच्या दोन्ही पत्नी आणि मुलांसोबत एकत्र राहतात. हेलन यांना सलमान आणि त्याच्या भावंडांनी आईचं स्थान दिलं आहे.