Diet Plan मध्ये दडलंय विराटच्या फिटनेसचं रहस्य! तुम्हीही Fallow करु शकता हा डाइट प्लॅन

Virat Kohli Diet Plan: सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक अशी ओळख असलेल्या विराट कोहलची क्रेझ भारताबरोबरच भारताबाहेरही असल्याचं दिसून येतं. विराटची फिटनेसही कायमच चर्चेत असते. अनेकदा तो व्ययाम करतानाचे, जीममधील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतो. मात्र केवळ व्यायामुळे नाही तर उत्तम डाइटमुळे विराटला इतकी छान शरीरयष्टी लाभली आहे की मैदानातील त्याची चपळता लक्ष वेधून घेते. विराटचा डाइट प्लॅन नेमका कसा असतो पाहूयात...

Jun 04, 2023, 13:12 PM IST
1/11

Virat Kohli Diet Plan

जगातील सर्वात फिट अॅण्ड फाइन क्रिकेटपटूंबद्दल बोलयाचं झालं तर विराट कोहलीचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आपल्या खेळाबरोबरच फिटनेससाठी घेत असलेल्या मेहनतीमुळे विराट कायम चर्चेत असतो.

2/11

Virat Kohli Diet Plan

मात्र विराटने व्यायामाबरोबरच संतुलीत आहाराच्या जोरावर आपलं शरीर कमावलेलं आहे. विराट नेमकं काय खातो आणि दिवसातून किती वेळ व्यायाम करतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

3/11

Virat Kohli Diet Plan

विराट कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या सामन्यासाठी इंग्लंडमध्ये सराव करत आहे. हा सामना 7 जूनपासून सुरु होणार आहे.

4/11

Virat Kohli Diet Plan

सराव करतानाचे आणि इंग्लंडमधील इतरही फोटो विराटने मागील काही दिवसांमध्ये पोस्ट केले आहेत. विराट सरावाबरोबरच संतुलित आहारालाही प्राधान्य देतो.

5/11

Virat Kohli Diet Plan

आपल्या डाइटसंदर्भात विराटनेच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ खाण्याचं विराट टाळतो. या पदार्थांमुळे शरीरावर आणि पर्यायाने त्याच्या कामगिरीवर परिणाम होईल असं त्याचं म्हणणं आहे.

6/11

Virat Kohli Diet Plan

विराट ब्रेकफास्टला उकडलेली अंडी आणि ब्रेड ऑमलेट खातो. त्याचप्रमाणे त्याला पालक आणि पनीरचं सॅलेडही सकाळच्या नाश्त्याला खायला आवडतं.

7/11

Virat Kohli Diet Plan

दुपारच्या जेवणाऱ्या वेळी विराटला गोड खायला आवडतं. तो दुपारी सुकामेवा, ब्राऊन ब्रेड खाण्याबरोबरच प्रोटीन शेक पितो.

8/11

Virat Kohli Diet Plan

प्रोटीन शेख सारख्या गोष्टींमुळे विराटच्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते आणि बॉण्डी मेन्टेन ठेवण्यासाठी याची मदत होते.

9/11

Virat Kohli Diet Plan

रात्री जेवणामध्ये विराट डाळ आणि रोटी खातो. तसेच विराट हिरव्या भाज्या खाण्यावरही जोर देतो.

10/11

Virat Kohli Diet Plan

विराट किती व्यायाम करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर विराट आठवड्यातील 5 दिवस जीममध्ये घाम गळतो.

11/11

Virat Kohli Diet Plan

आठवड्यातून 2 दिवस विराट त्याच्या शरीराला आराम देतो आणि कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाही. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)