काय सांगता! उच्च रक्तदाबाची 'ही' लक्षणे आहेत धोकादायक, वेळीच सावध व्हा!

High Blood Pressure : आजच्या काळात बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. या आजाराला सायलेंट किलर असेही म्हणतात. कारण त्यात विशेष लक्षणे दिसत नाहीत. अशा वेळी रुग्णाच्या आजाराचे निदान होण्यास बराच वेळ जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, भारतातील प्रत्येक 4 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका आहेच.

May 19, 2023, 17:02 PM IST
1/5

मळमळ

High Blood Pressure

उच्च रक्तदाबाच्या समस्येमध्ये व्यक्तीला उलट्या आणि मळमळ सुरू होते. त्यामुळे तुम्हाला अशी समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

2/5

अंधुक दृष्टी

High Blood Pressure

शरीरात उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास त्याचे परिणाम डोळ्यांवर होतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्या खराब होतात. अशा वेळी तुम्हाला अस्पष्ट दिसता. म्हणूनच जर तुमची दृष्टी अंधुक असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

3/5

तीव्र डोकेदुखी

High Blood Pressure

उच्च रक्तदाबामुळे तुम्हाला गंभीर डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. हाय बीपीच्या बहुतेक रुग्णांना या प्रकारचा त्रास होतो. म्हणूनच जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका.

4/5

डोळे लाल होणे

High Blood Pressure

जेव्हा उच्च रक्तदाब सुरू होतो तेव्हा तुमचे डोळे लाल होतात. शरीरातील रक्तदाब वाढल्याने रक्तवाहिन्यांमधील दाब वाढतो, त्यामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे डोळ्यांना काही समस्या असल्यास बीपीची तपासणी करून घ्यावी.

5/5

वारंवार लघुशंका होणे

High Blood Pressure

जर तुम्हाला वारंवार लघुशंकेला होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण असे करणे घातक ठरू शकते. अशावेशी डॉक्टरांना भेटा.. (Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)