Weight Gain Reasons : मित्रमंडळींसोबतची भेटच वाढवतेय लठ्ठपणा... कसा ते पाहा आणि वेळीच सावध व्हा!

Weight Gain Reasons : कितीही व्यायाम केला, चाललं किंवा आणखी काही उपाय केले तरीही हा कमरेचा घेर काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये... असा सूर हल्ली अनेकजण लगावतात. हा कमरेचा घेर म्हणजे दुसरंतिसरं काही नसून तुमच्या शरीरातील वाढलेली चरबी असते.   

Apr 27, 2023, 14:27 PM IST

Weight Gain Reasons : गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं बदलणाऱ्या जीवनशैलीचे थेट परिणाम आरोग्यावरही होताना दिसत आहेत. अनेकांच्या चांगल्या सवयी दुरावत असून, काही वाईट सवयी नकळतच अंगी बाणवल्या जात आहेत. 

 

1/7

व्यायामाचा खरंच फायदा होतोय?

health news Weight Gain Reasons latest update

तुम्ही चालता, बोलता, व्यायाम करता, खाण्यावरही नियंत्रण ठेवता. पण, त्याव्यतिरिक्त तुम्ही पार्टी करता, मित्रांना भेटता, तासनतास एका ठिकाणी बसता हे कसं विसरताय?   

2/7

मित्र आणि पार्टी

health news Weight Gain Reasons latest update

बऱ्याचदा तर, जीवाचा आटापिटा करून बाहेरच्या खाण्याच्या सवयी बदललेल्या असताना इकडचे तिकडचे, ऑफिसचे, सोसायटीतले, ह्याचेत्याचे मित्र भेटले की मात्र खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होतं आणि याच चुका सातत्यानं होत राहतात. पुढे आरशासमोर जेव्हा आपण एकांतातच स्वत:ला न्याहाळतो तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. कारण, आपण स्थुलतेकडे झुकत असतो.   

3/7

टीव्ही, मोबाईल

health news Weight Gain Reasons latest update

तुम्हाला माहितीये का, ज्या टीव्ही किंवा मोबाईलसमोर तुम्ही मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहता त्याच या गोष्टी तुमचं वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. कारण, यामुळं तुम्ही व्यायामाचा वेळ कमी करता. 

4/7

जंक फूड

health news Weight Gain Reasons latest update

ऑफिसच्या कामांचाच इतका ताण असतो, की घरातून जेवण बनवून नेणं अनेकांनाच शक्य होत नाही. मग? मग काय, बर्गर किंवा तत्सम पदार्थांवर ताव मारून जीभेचे चोचले पुरवले जातात आणि स्थुलतेला आमंत्रण दिलं जातं. 

5/7

मैदायुक्त पदार्थ

health news Weight Gain Reasons latest update

हल्ली नाही म्हणता मैदायुक्त बिस्कीटं, ब्रेड, पिझ्झा, केक आणि अशा अनेक गोष्टी आपल्या खाण्यात येतात. ज्यामुळं स्थुलता आणि सोबतच मधुमेह, कर्करोगाचा धोका संभवतो. 

6/7

शीतपेय

health news Weight Gain Reasons latest update

बऱ्याचदा तहान लागलेली असताना एक घोट शीतपेय प्यायलो तर, बरं वाटेल असं म्हणत तुम्ही नकळत संपूर्ण बॉटर रिकामी करता. तात्पुरतं बरंही वाटतं. पण, तुमच्या शरीरावर या प्रत्येक घोटातून प्रचंड साखर आणि कॅलरी गेलेल्या असतात त्यांचं काय?   

7/7

पुरेशी झोप

health news Weight Gain Reasons latest update

नकळतच वजन वाढण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, पुरेशी झोप न घेणं. किमान 8 तास झोपा, असा सल्ला देऊनही काही कारणास्तव ते अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही बाहेरचं खा अथवा खाऊ नका, तुमचं वजन वाढण्यास सुरुवात होते. गोष्टी अगदी लहानशा आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यास तुमची संकटं वाढातात ही बाब इथं लक्षात घेणं गरजेचं आहे.