Best Tourist Places in India: भारतातील 'ही' सुंदर ठिकाणे तुम्ही पाहिली आहेत का? नसेल तर एकदा भेट द्या !
Indian Beautiful Tourist Places : उन्हाळ्याची शाळांना सुट्टी पडलेली आहे. मुलांना घेऊन तुम्ही तुम्ही फिरण्याचा बेत करत असला तर भारतीय ही प्रेक्षणीय स्थळे तुम्ही पाहू शकता. जगभरातील लोक या ठिकाणांना आवर्जुन भेट देत असतात. कारण येथील हवामान खास आहे. जर तुम्ही भारतात रहात असाल तर इथे तुम्हाला पहाड, समुद्र, जंगल आणि हिल स्टेशन सारे पर्याय पाहायला मिळतील. बस तुम्ही तुमची बॅग पॅक करा आणि फिरण्यासाठी आणि मौजमज्जा करण्यासाठी बाहेर पडा. ही आहेत भारतातील सुंदर ठिकाणे.

Ladakh Places : उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण झाला असाल तर उन्हाळ्याच्या दृष्टीने लडाख हे भारतातील सुट्ट्यांसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. लडाख हे प्रत्येक दुचाकीस्वाराचे स्वप्नातील ठिकाण आहे. लडाखच्या टेकड्या आणि तलाव हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहेत. पन्ना पँगॉन्ग त्सो सरोवराला भेट देऊन तुम्ही आनंद लुटू शकता.


