Guru Purnima Wishes in Marathi : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता करा व्यक्त!

Guru Purnima Wishes in Marathi : आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमा हा सण गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. आपल्या गुरु प्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमाचा सण साजरा करण्यात येतो. अशा या गुरुला खास मराठी शुभेच्छा पाठून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा. 

| Jul 20, 2024, 19:34 PM IST
1/10

आयुष्यातला पहिला गुरू म्हणजे आई जिने प्रत्येकावर संस्कार केले आणि त्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल घडवलं. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

2/10

जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहिही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्या सारख्या गुरुना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही  

3/10

गुरु हाच देव आहे,गुरु हाच श्वास, गुरू हेच सुख,आणि गुरूचाच ध्यास. गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

4/10

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुंना खूप खूप शुभेच्छा  

5/10

स्वतःचा त्याग करून शिष्याला सर्वस्व प्राप्त करून देतो तो गुरू महान असतो. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !  

6/10

 गुरू हाच परीस आहे, ज्याचा स्पर्श होताच आपल्या आयुष्याचं सोनं होतं गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

7/10

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया. आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

8/10

ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड ज्याला आहे अगाध ज्ञान जो देई हे निस्वार्थ दान गुरु त्यासी मानावा देव तेथेची जाणावा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!  

9/10

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात भर पाडलेल्या सर्व गुरूंना धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

10/10

गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पाशी तुका म्हणा ऐंसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!