Google 'या' युजर्सचे Gmail Accounts करणार डिलीट! तुमचं Account तर यात नाही ना?

Google Will delete These Accounts: आपल्यापैकी जवळजवळ सर्वच लोक गुगलच्या सेवा वापरत असतील. यामध्ये अगदी जीमेल, गुगल फोटो, युट्यूब सारख्या सुविधांचा समावेश असतो. मात्र आता गुगलने मोठ्या प्रमाणात अकाऊंट्स डिलीट करण्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अनेकांना फटका बसू शकतो. हा फटका नेमका कोणाला, कधी आणि कसा बसू शकतो जाणून घेऊयात...

| May 23, 2023, 14:46 PM IST
1/13

Google Will delete inactive Accounts

तुम्ही गुगलच्या सेवा वापरता का? तुम्ही गुगलवर अकाऊंट सुरु करुन मागील बऱ्याच काळापासून ते वापरलं नाही असं आहे का? असं असेल तर वेळीस सावध व्हा. कारण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गुगलकडून पॉलिसी अपडेट केली जात आहे.

2/13

Google Will delete inactive Accounts

या नव्या धोरणामध्ये कंपनीने इनअॅक्टीव्ह अकाऊंट पॉलिसीही (inactive account policies) अपटेड करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणानुसार कंपनी अशा गुगल युझर्सची खाती डिलीट करणार आहेत ज्यांनी मागील बऱ्याच काळापासून आपली अकाऊंट्स वापरलेली नाहीत.

3/13

Google Will delete inactive Accounts

गुगल इनअॅक्टीव्ह खाती डिलीट करणार आहेत. त्यामुळेच तुम्हीही मागील बऱ्याच काळापासून आपलं जीमेल, गुगल फोटोज किंवा इतर कोणत्याही सेवा वापरला नसतील तर तुमच्या खात्यासहीत इतर अनेक गोष्टी गुगल डिलीट करु शकतं.

4/13

Google Will delete inactive Accounts

गुगल कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. 2 वर्षांहून अधिक काळापासून न वापरलेली गुगल अकाऊंट्स डिलीट करण्याचा कंपनीचा मानस आहे.

5/13

Google Will delete inactive Accounts

सर्व गुगल युझर्सची सुरक्षा लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 2020 साली कंपनीने निष्क्रिय खात्यांवर स्टोअर करण्यात आलेला कंटेंट हटवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता थेट ही खातीच डिलीट केली जाणार आहेत.

6/13

Google Will delete inactive Accounts

नुसती खाती तयार करुन ती कधीच वापरात आणली नाहीत अशी खाती सर्वात आधी डिलीट केली जातील. आगामी काळात कंपनी यासंदर्भातील अधिक माहिती युझर्ससाठी जारी करणार आहे.

7/13

Google Will delete inactive Accounts

2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळापासून वापरता नसलेल्या खात्यांसंदर्भातील ही कारवाई गुगल याच वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरु करणार आहे.

8/13

Google Will delete inactive Accounts

गुगलची जी खाती सक्रीय नसतात ती सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असतात, असं गुगलने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. या खात्यांबरोबर काही छेडछाड झाली आणि त्यामधील माहिती उघड झाली तर युझर्स अडचणीत येतील.

9/13

Google Will delete inactive Accounts

सक्रीय नसलेल्या खात्यांवरुन चोरलेल्या माहितीच्या आधारे डिजीटली चोरी करणारे गुन्हेगार म्हणजेच हॅकर्स आणि स्पॅमर्स इतरांची फसवणूक करु शकतात. टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या सुविधेमध्येही ही सक्रीय नसलेली खाती अडथळा ठरतात असा कंपनीचा दावा आहे.

10/13

Google Will delete inactive Accounts

गुगलने या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार सक्रीय नसलेल्या खात्यांवरुन सर्व माहिती ही खातीच डिलीट केली जातील. त्यामुळे या खात्यांशी संबंधित सर्व कंटेट कायमचा डिलीट केला जाईल.

11/13

Google Will delete inactive Accounts

वर्कस्पेसमधील माहितीही डिजीट होणार आहे. म्हणजेच जीमेल, गुगल डॉक्स, गुगल ड्राइव्ह, गुगल मीट, कॅलेंडरसारख्या नोंदी डिलीट होतील. सक्रीय नसलेल्या खात्यांची युट्यूब अकाऊंट आणि फोटोही डिलीट केले जातील.

12/13

Google Will delete inactive Accounts

हे नवं धोरण केवळ वैयक्तिक खात्यांसाठी लागू होणार असल्याचं गुगल कंपनीचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित निष्क्रिय खाती डिलीट केली जाणार नाहीत असं कंपनीने म्हटलं आहे.

13/13

Google Will delete inactive Accounts

अनेकदा लोक 2 ते 3 गुगल अकाऊंट तयार करतात मात्र त्यांचा वापर केला जात नाही. अशी खाती डिलीट करण्याचा गुगलचा विचार असून त्यासंदर्भातील बॅकएण्डची कारवाई सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. (सर्व फोटो - रॉयटर्स, एपीवरुन साभार)