Gold and Silver Rates: सोने 1,096 रुपयांनी स्वस्त तर चांदी 3,413 रुपयांनी घसरली

Gold and Silver Price: काही महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकू शकतात, असे दिसते. मे महिन्यात सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 739 रुपयांवर पोहोचली होती.  त्याच वेळी 1 किलो चांदीचा भाव 77,280 रुपयांवर होता. मे महिन्यापासून आतापर्यंत चांदीच्या दरात किलोमागे सात हजार रुपयांची घट झाली आहे.

| Aug 20, 2023, 10:56 AM IST

Gold and Silver Price:सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा स्वस्त होत आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 1,096 रुपयांची, तर चांदीची किंमत 3,413 रुपयांनी कमी झाली आहे. 

1/7

Gold and Silver Rates: सोने 1,096 रुपयांनी स्वस्त तर चांदी 3,413 रुपयांनी घसरली

Gold and Silver Price Fall know Today Rates

Gold and Silver Price: सराफा बाजारात 31 जुलै रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59 हजार 567 रुपये आणि 1 किलो चांदीचा भाव 73 हजार 860 रुपयांवर बंद झाला होता. दुसरीकडे, गेल्या शुक्रवारी, 18 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव 58 हजार 471 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 1 किलो चांदी 70 हजार 447 रुपयांवर होता. 

2/7

सोने चांदीचा भाव

Gold and Silver Price Fall know Today Rates

23 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार 237 रुपये आणि 22 कॅरेटचा भाव 53 हजार 559 रुपये होता. त्याच वेळी, 18 कॅरेट सोन्याचा भाव 43 हजार 853 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 34 हजार 206 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. या दरम्यान चांदी 70 हजार447 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

3/7

सोन्याचे भाव पडले

Gold and Silver Price Fall know Today Rates

आपण बारकाईने पाहिल्यास, सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा स्वस्त होत आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 1,096 रुपयांची, तर चांदीची किंमत 3,413 रुपयांनी कमी झाली आहे. 

4/7

सोन्याचे भाव आणखी वाढतील

Gold and Silver Price Fall know Today Rates

यावरून येत्या काही महिन्यांत सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात, असे दिसते. मे महिन्यात सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 61 हजार 739 रुपयांवर पोहोचली होती.  त्याच वेळी 1 किलो चांदीचा भाव 77,280 रुपयांवर होता. मे महिन्यापासून आतापर्यंत चांदीच्या दरात किलोमागे सात हजार रुपयांची घट झाली आहे.

5/7

ऑगस्टमधील दर

Gold and Silver Price Fall know Today Rates

ऑगस्टमध्ये सोन्याचा व्यवसाय असाच काहीसा होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव 59 हजार 567 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 59 हजार 61 रुपयांवर आला, तर चांदीचा भाव 73 हजार 860 रुपये प्रति किलोवरून घसरून 72 हजार रुपयांवर बंद झाला. 

6/7

दुसरा आठवडा

Gold and Silver Price Fall know Today Rates

दुसऱ्या आठवड्यात 7 ऑगस्ट रोजी सोने 59 हजार 108 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले आणि आठवड्याच्या शेवटी 58हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले. चांदीची चमक कमी झाल्यामुळे त्याची किंमत 71 हजार 848 रुपये प्रति किलोवरून 70 हजार 098 रुपये झाली.

7/7

तिसऱ्या आठवड्यातही घसरणीचा कल कायम

Gold and Silver Price Fall know Today Rates

सुट्टीच्या आठवड्यातील चार दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण झाली. आठवड्याच्या सुरुवातीला 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58 हजार 843 रुपये होता तो 58 हजार 471 रुपयांवर आला. मात्र, चांदीमध्ये किंचित वाढ दिसून आली. आठवड्याच्या अखेरीस चांदीची किंमत 70 हजार 160 रुपयांवरून वाढून 70 हजार 447 रुपये प्रति किलो झाली.