रहस्य की आणखी काही... जगातील एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडला नाही, सौंदर्य पाहून थक्क व्हाल!

पाऊस हा निसर्गप्रेमींसाठी आवडताच आहे. पावसाचं वातावरण अल्हाददायक असते. निसर्ग मुक्तहस्ताने उधळण करते. मात्र, जगात असं एक गाव आहे. जिथे आजवर एकदाही पाऊस झालेला नाही.

| Nov 21, 2024, 13:50 PM IST

पाऊस हा निसर्गप्रेमींसाठी आवडताच आहे. पावसाचं वातावरण अल्हाददायक असते. निसर्ग मुक्तहस्ताने उधळण करते. मात्र, जगात असं एक गाव आहे. जिथे आजवर एकदाही पाऊस झालेला नाही.

1/7

रहस्य की आणखी काही... जगातील एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडला नाही, सौंदर्य पाहून थक्क व्हाल!

GK Interesting Facts Al Hutaib Yemen only village in the world where it never rains

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पाऊस कमी होतो किंवा पाऊस थांबतच नाही. पण पृथ्वीवर असं एक ठिकाण आहे जिथे आजवर पाऊसच झाला नाहीये. पाऊस नसला तरीही या गावाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. 

2/7

रिपोर्टनुसार, या गावात साधारण 14 दशलक्ष पाऊसच झाला नाहीये. यमन देशाची राजधानी असलेल्या सना शहराच्या हरज क्षेत्रास वसलेल्या अल हुतैब या गावात अद्याप एकदाही पाऊस झालेला नाही. 

3/7

 अल हुतैब गाव डोंगरावर वसलेले आहे. येथून निसर्गाचा नजारा खूपच सुंदर दिसतो. हिवाळ्याच्या दिवसांत येथील वातावरण खूप थंड असतो तर, उन्हाळ्याच्या दिवसांत कडकडीत उन असतं.

4/7

 हिवाळा आणि उन्हाळा हे दोन्हीच ऋतु या गावात अस्तित्वात असले तरी पावसाळा मात्र कधीच येत नाही. अल हुतैब या गावात प्राचीन व आधुनिक दोन्ही प्रकारच्या वास्तुकलेचा संगम दिसून येतो.

5/7

अल हुतैब गाव समुद्रसपाटीपासून 3200 मीटर उंचीवर आहे. त्यामुळं हे गाव डोंगराच्या टोकावर आहे. साधारणपणे ढग समुद्रसपाटीपासून 2000 उंचीवरुन वाहत असतात. त्यामुळं ढगदेखील या गावापासून कमी उंचीवर वाहतात

6/7

 याच कारणामुळं या गावात एकही थेंब पाऊस पडत नाही. पण असं असलं तरी हे गाव निसर्गाने नटलेले आहे.

7/7

 अल हुतैब गाव हे एका उंच डोंगराच्या टोकावर असल्याने तिथील खालचे दृश्य अत्यंत निसर्गरम्य भासते. डोंगराच्या उंचावर राहत असल्याने आणि खाली पांढऱ्या शुभ्र ढगांची दाटी यामुळं या गावातील लोकांना जणू स्वर्गातच राहत असल्याचा भास होतो.