महाराष्ट्रात भौगोलिक चमत्कार! पुण्याजवळील जगप्रसिद्ध रांजणखळगे, दुष्काळ पडला तरी आटत नाही पाणी

पुण्याजवळील रांजणखळगे निसर्गाची चमत्कारिक कलाकृती. 

May 06, 2024, 00:05 AM IST

Ranjan khalage, Nighoj : महाराष्ट्रत अनेक मानवनिर्मीत तसेच निसर्गनिर्मीत कलाकृती पहायला मिळतात. याचप्रमाणे  महाराष्ट्रात भौगोलिक चमत्कार देखील पहायला मिळतो. पुण्याजवळील रांजणखळगे निसर्गाची चमत्कारिक कलाकृती आहे. 

1/7

महाराष्ट्रात निसर्गाची चमत्कारिक कलाकृती पहायाला मिळते. हा चमत्कार म्हणजे पुण्याजवळील जगप्रसिद्ध रांजणखळगे.   

2/7

रांजणखळग्याचे वैशिष्ट्य म्हणेज  दुष्काळ पडला तरी यातले पाणी आटत नाही. 

3/7

नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहेत. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर झाले. हजारो वर्षानंतर या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर झालेय.

4/7

कुकडी पात्रात २०० मी लांब व ६० मी. रुंद इतक्या भागात विविध आकाराचे रांजणखळगे पाहायला मिळतात.

5/7

रांजण खळगे म्हणजे नदीपात्रातील खडकात प्रवाहामुळे तयार झालेले खड्डे. 

6/7

कुकडी नदीच्या पात्राजवळ असलेल्या कुंडमाऊली मळगंगा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसह  रांजणखळगे पाहण्यासाठी येथे भाविकांची गर्दी होते.  

7/7

पुण्यातील शिरूर आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याच्या सीमेवरील कुकडी नदीच्या पात्रात  जगप्रसिद्ध रांजणखळगे आहे.