Gemstone : हा मौल्यवान खडा अंगठीत वापरलात तर मोठा लाभ, नोकरी-व्यवसायात यश

Gemstone Benefits : अनेत जण अंगठीत मौल्यवान रत्न अर्थात खडे परिधान करत असतात. हे मौलवान रत्न तुमच्यासाठी लकी असतात. शास्त्रामध्ये रत्न आणि खड्यांची माहिती देण्यात आली आहे. जो ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. यानुसार, प्रत्येक खडे हे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह कमकुवत स्थितीत असतो तेव्हा त्याला मजबूत करण्यासाठी ही मौल्यवान रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. ते परिधान करताच तुम्हाला त्या ग्रहांचा आशीर्वाद मिळू लागतो आणि तुमची भरभराट होते.

May 13, 2023, 08:42 AM IST
1/5

ज्यांच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर आहे, त्यांनी माणिक्य (खडा) धारण करण्याचा सल्ला दिला जातो. त्याला इंग्रजीत रुबी असे म्हणतात. हा मौल्यवाण खडा धारण केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि नोकरी-व्यवसायात यश मिळते. 

2/5

काही लोकांच्या कुंडलीत दोष असतो. त्या लोकांना माणिक्य परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने सर्जनशील शैली सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो. यासोबतच समाजात मान-सन्मान आणि कीर्ती वाढते.

3/5

काही असे मौल्यवान खडे असतात अर्थात रुबी कधीही लोखंडी अंगठीत घालू नये. असे करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकते.

4/5

हे माणिक्य रत्न आरोग्याच्या दृष्टीनेही खूप चांगले मानले जाते. यामुळे हाडे खूप मजबूत होतात आणि त्वचेशी संबंधित आजारांपासूनही आराम मिळतो.

5/5

रुबी हे माणिक्य धारण करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या. हा खडा, गोमेद, हिरा, नीलमणी धारण करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकते. तर, ते पुष्कराज, कोरल, पन्ना आणि मोती सोबत परिधान केले जाऊ शकतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)