GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे  वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 22, 2023, 18:34 PM IST

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

1/11

राजेश थोरात

गणेश उत्सवासाठी मोरपंखाचे सुंदर आरास, श्री कृष्णा सारख्या चंचल स्वरूपात यावेळी राजेश थोरात यांच्या कडे बाप्पाचे आगमन झाले. 

2/11

संदीप चव्हाण

फुलांच्या बागेत लाडका बाप्पा विराजमान असेल अशी सुंदर सजावट यंदा संदीप चव्हाण यांच्या घरी झाली. 

3/11

अरुण गुजर

अरुण गुजर यांनी लाडक्या बाप्पाचे आगमन हे अगदी विलक्षणीय सजवटीने केले आहे. बाप्पाची प्रतिमा खूप मनमोहक आणि सुंदर आहे. 

4/11

रीआन किणीकर

रीआन किणीकर यांच्या घरचा बाप्पा अगदी भव्य पद्धतीने सजवले आहे, फुलांच्या आणि लायटिंगच्या डेकोरेशन सोबत बाप्पा खूप मनमोहक दिसत आहे. 

5/11

अंतिम घोरपडे

गणेश उत्सव साजरी कारण्यासाठी अंतिम घोरपडे यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिकृतिची सजावट केली आहे, आणि वेगळ्या पद्धतीने बाप्पाची स्थापना केली. 

6/11

श्वेता भागवत

यंदा भागवत परिवाराने अमेरिकेत आपल्या घरी बाप्पाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने केल आहे, बाप्पाची प्रतिमा स्वतः बनवून तिचे सुंदर रित्याने रंग आणि सोपी सजावट करून गणेश उत्सव साजरी केला. 

7/11

मितांश जोशी

मितांश जोशी यांनी यंदा गणेश डेकोरेशनसाठी सोन्याच्या जेजुरीची प्रतिकृति केली आहे. या पद्धतीचे आरास खूप विलक्षणीय दिसत आहे आणि बाप्पाची प्रतिमा ही मनमोहक आहे. 

8/11

आशीष उदास

आशीष उदास  यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत छोट्या गणेश प्रतिमा सोबत केले, बाप्पाची प्रतिमा ही खूप मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. 

9/11

यश पांचाळ

पांचाळ परिवाराने सोप्या आणि सुंदर रित्याने बाप्पाचे आगमन पार पाडले, तर बाप्पाची सजावट ही सोप्या सोनेरी लाइटने पूर्ण केली  आहे. 

10/11

शिवराज पाटील

पाटील परिवाराने केदारनाथच्या मंदिराची आणि डोंगरांची  प्रतिकृती सादर करत एक सुंदर आणि वलक्षणीय आरास बाप्पासाठी केला आहे. 

11/11

सोनिया शेट्टे

सोनिया शेट्टे यांनी आपल्या घरी बाप्पाचे स्वागत  अगदी भव्य पद्धतीने केले आहे, लाइटिंग आणि पानांच्या सजावटी सुंदर पद्धतीने पार पडली आहे.