Ganpati 2025 Date: होय! पुढल्या वर्षी बाप्पा लवकरच येणार.. गणेश चतुर्थी 2025 ची तारीख पाहिली का?

Ganpati 2025 Date: गणरायांना निरोप देताना भक्तांना लगेच उत्सुकता असते की पुढील वर्षी गणराय कधी भेटीला येणार. यंदा अनंत चतुर्थीला गणरायांना निरोप देताना 2025 ला गणेशोत्सव कधी आहे याबद्दलची उत्सुकता अनेकांना असून आतापासूनच त्याबद्दलची माहिती सर्च केली जात आहे. चला तर जाणून घेऊयात पुढल्या वर्षी कधी भेटीला येत आहेत आपले लाडके बाप्पा...

| Sep 17, 2024, 12:44 PM IST
1/11

ganeshcahturthi2025

होय, पुढल्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहे. पण लवकर म्हणजे यंदाच्या वर्षीपेक्षा किती आधी आणि नेमका किती तारखेला जाणून घेऊयात...

2/11

ganeshcahturthi2025

आजचा दिवस गणेश भक्तांसाठी फारच भावूक करणार कारण आज आहे, अनंत चतुर्दशी! गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस प्रत्येक गणेश भक्ताला भावूक करणारा असतो.  

3/11

ganeshcahturthi2025

गणेश चतुर्थीच्या दिवशी अगदी वाजतगाजत घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांपैकी काहींची मुक्काम दीड दिवसांचा असतो.  

4/11

ganeshcahturthi2025

काहींच्या घरी गणपतीचा मुक्काम पाच दिवसांचा, काहींकडे सात दिवसाचा तर काहींचा दहा दिवसाचा मुक्का असतो. दहाव्या दिवशी जवळपास सर्वच घरगुती गणपती आणि मंडळांच्या मोठ्या गणेश मुर्तींचं विसर्जन केलं जातं.  

5/11

ganeshcahturthi2025

दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाची मनोभावे पुजा-आर्चा केल्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी उत्तरपूजा करुन गणरायांचं विधिवत सागर, नदी, सरोवर वा कृत्रिम तलावात विसर्जन केलं जातं.  

6/11

ganeshcahturthi2025

बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावतात. चिमुकल्यांसाठीही लाडक्या गणू बाप्पाला निरोप देणं कठीण असतं.  

7/11

ganeshcahturthi2025

अगदी लहानथोर सारीच मंडळी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून, 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!'  अशा घोषणा देत लाडक्या बाप्पाला निरोप देतात.   

8/11

ganeshcahturthi2025

मात्र यंदा गणेशभक्तांचा निरोप घेणारे बाप्पा खरोखरच भक्तांचं ऐकून पुढील वर्षी लवकर येणार आहेत. आज बाप्पाच्या निरोपाच्या दिवशी झालेल्या दुखावर फुंकर मारणारी समाधानकारक बाब म्हणजे पुढल्या वर्षी बाप्पा चक्क 10 दिवस लवकर येणार आहेत.

9/11

ganeshcahturthi2025

गणेश चतुर्थी मंगळवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी येणार आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षीपेक्षा पुढील वर्षी बाप्पा तब्बल 10 दिवस लवकर येणार आहेत. पुढल्या वर्षी 6 सप्टेंबर रोजी बाप्पा भक्तांचा निरोप घेतील.   

10/11

ganeshcahturthi2025

2026 साली मात्र गणपती बाप्पा यंदाच्या म्हणजेच 2024 पेक्षाही 10 दिवस उभारा येणार आहेत. 2026 ला गणेश चतुर्थी 15 सप्टेंबर रोजी आहे.  

11/11

ganeshcahturthi2025

त्यामुळेच यंदा गणपती बाप्पा 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन परतीला निघाले असले तरी तुमची 'पुढच्या वर्षी लवकर या'ची मागणी बाप्पांनी मान्य केली आहे असं किमान पुढच्या वर्षीपुरतं तरी म्हणता येईल.