करीनाची Zero Figure सोडा! 'या' अभिनेत्रीचं वजन फक्त 25 किलो, सीक्रेटही सांगेना

छोट्या पडद्यावरील कनिका माननं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तिचं वजन 25.7 किलो असल्याचं दिसतंय. कनिकाच्या वजनाला पाहता नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. 

| Jun 20, 2024, 18:32 PM IST
1/7

छोट्या पडद्यावरील 'गुड्डन-तुमसे ना हो पाएगा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कनिका मान यावेळी सोशल मीडियावर चर्चेत आली आहेत. त्याचं कारण तिनं वजन करतानाचा फोटो शेअर केला आहे. कनिकाचं वजन पाहिल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. 

2/7

कनिका माननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वजन करतानाचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिचं वजन हे फक्त 25.7 किलो दिसत आहे. तिच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

3/7

हे फोटो शेअर करत कनिकानं कॅप्शन दिलं की अपडेट. तर एक कमेंट करत कनिकानं म्हटलं की 'कृपया मला हे विचारू नका की मी वजन कमी कसं ठेवलं.'

4/7

कनिका मानच्या फोटोवर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट केल्या आहेत. खरंतर, कनिका मानचं वजन इतकं कमी झाल्यानं त्यावर कोणालाही विश्वास होत नाही आहे. राहुल वैद्य म्हणाला, 'मस्त फोटोशॉप केलं असं म्हणता येईल.' त्यासोबतच त्यानं हसणारं इमोजी देखील शेअर केलं आहे. अशाच अनेक कमेंट करत सेलिब्रिटींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

5/7

कनिका मानच्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 25.7 किलो अशक्य आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, '25 किलो वजनात इतकं हेल्दी राहणं अशक्य.' एका नेटकरी म्हणाला, 'कनिकाजी दिशा पटानीला ओळखतेस का? ती तुझ्याहून 4000 पट फिट आहे पण तिचं वजन देखील 50 किलो आहे आणि त्यातही तू तिच्याहून कुठे जास्त जाड आहेस. तरी दाखवतेस की 25 किलोची आहे. इतकं खोटं बोलू नकोस.'

6/7

कनिकानं अजून तिचं वजन इतकं कमी कसं याचा खुलासा केलेला नाही. अशात चाहत्यांनी त्यांचा अंदाज बांधत आहेत. एकानं कॉमेंट केली की 'तिनं वजन करण्याच्या मशीनच्या खाली टॉवेल ठेवला आहे त्यामुळे ते चुकीचं दाखवतंय.' 

7/7

कनिका मान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'गुड्डन तुमसे ना हो पाएगा', 'रूहानियत' आणि 'बढ़ो बहू' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'रॉकी मेंटल', 'दाना पानी', 'शूटर' आणि 'बृहस्पति' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.