रोज सकाळी पूजा करण्याआधी पाळा देव्हाऱ्याचे हे 7 नियम, पितृदोषापासून मुक्ती मिळून आयुष्यात येईल भरभराट

| Jul 17, 2023, 09:58 AM IST
1/9

रोज सकाळी पुजा करण्याआधी पाळा देव्हाऱ्याचे हे 7 नियम, पितृदोषापासून मुक्ती मिळून आयुष्यात येईल भरभराट

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

Worship Rules: सनातन धर्माचे पालन करणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये स्वतंत्र देव्हाऱ्यात असतो. यालाच पूजागृह किंवा मंदिर असेही म्हणतात. यामध्ये नियमित धूप दिवे लावून पूजा केली जाते. सामान्यतः सर्वजण सारख्या पद्धतीने पूजा करतात. असे असले तरीही देव्हाऱ्याशी संबंधित काही नियम आहेत. जे बहुतेक लोक पूजा करताना विसरतात. असे केल्याने पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही तर पितृदोषही होतो, असे म्हटले जाते. 

2/9

देव्हाऱ्याशी संबंधित नियम

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

धार्मिक ग्रंथांनुसार नियमांचे पालन केल्याने उपासनेचा लाभ तर मिळतोच पण देव सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि घरात सुख-संपत्ती येते. घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो असे म्हटले जाते. तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर पूजा करत असाल, पण देव्हाऱ्याशी संबंधित नियम माहिती करुन घ्या.

3/9

पूजेपूर्वी मंदिर स्वच्छ करा

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

ज्योतिष शास्त्रानुसार, घरात बनवलेल्या देव्हाऱ्यात पूजा करण्यापूर्वी त्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. यामध्ये देवाच्या मूर्ती कपड्याने स्वच्छ कराव्यात. असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. यासोबतच सकारात्मक उर्जेचा संचार होतो.

4/9

गंगाजल शिंपडा

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

ज्योतिष शास्त्रानुसार मंदिराची साफसफाई केल्यावर रोज गंगाजल शिंपडावे, पण तसे करणे जमत नसेल तर शनिवारी मंदिर स्वच्छ केल्यानंतर गंगाजल शिंपडा. असे केल्याने देवी लक्ष्मी मंदिरात वास करते. नकारात्मकता निघून जाते.  

5/9

दररोज दिवा स्वच्छ करा

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

पूजेचा दिवा लावण्यापूर्वी तो पूर्णपणे स्वच्छ करावा. स्वच्छ केल्याशिवाय दिवा लावू नये. यामुळे तुमची पूजा अपूर्ण समजली जाते.  

6/9

हे दोन दिवस देव्हारा स्वच्छ करू नका

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

देव्हारा साफ केल्यानंतरच प्रार्थना किंवा दिवा लावावा, पण गुरुवार आणि एकादशीला हे करू नका. या दिवशी मंदिराची स्वच्छता केल्याने देवी-देवता नाराज होतात, असे पुराणात सांगितले जाते. 

7/9

देवाचा फोटो चुकूनही खाली ठेवू नका

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

कोणत्याही दिवशी देव्हारा घर स्वच्छ करा. त्या दिवशी कोणतेही फोटो किंवा मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नये याची काळजी घ्या. स्वच्छ कपड्यावर किंवा उंच जागेवर ठेवा.

8/9

कापूर जाळणे

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

ज्योतिषशास्त्रानुसार पूजा करताना कापूर जाळला पाहिजे. यामुळे वास्तुदोष दूर होतात. यासोबतच पितृदोषापासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धी राहते.

9/9

पडदा

Follow these 7 rules before doing puja every morning get prosperous life Ahead

घरातील पूजा आटोपल्यानंतर देव्हाऱ्याचा पडदा लावाव. याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.    (Disclaimer:येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास डिजीटल त्याची पुष्टी करत नाही.)